(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : कोल्हापुरात शनिवारपासून जिजाऊ ब्रिगेडचे पहिले विभागीय महाधिवेशन
मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे पहिले विभागीय महाअधिवेशन 28 आणि 29 जानेवारीला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
Kolhapur News : मराठा सेवा संघ मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे (Jijau Brigade) पहिले विभागीय महाअधिवेशन 28 आणि 29 जानेवारीला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. या महाधिवेशनाचे उद्घाटन रविवारी सकाळी दहा वाजता अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या मार्गदर्शक संयोगिताराजे यांच्या हस्ते व प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील यांनी दिली. शनिवारी दुपारी चार वाजता ताराराणी चौक ते महासैनिक दरबार हॉल मार्गावरून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. (First Divisional Convention of Jijau Brigade)
या शोभायात्रेत मशाल रॅली, ग्रंथ दिंडी तसेच ढोल पथक लेझीम शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक होणार आहे. शोभा यात्रेत भगव्या साड्या परिधान करून राज्यभरातील महिला सहभागी होतील. आठ ते दहा या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी (First Divisional Convention of Jijau Brigade) रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये शाहिरी जलसा होणार आहे. यामध्ये दीप्ती व तृप्ती सावंत यांचे सादरीकरण होईल. दुपारी बारा ते दोन या कालावधीत 'महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे व्यवस्थापन' या विषयावर डॉक्टर वृषाली साबळे गुंजाळ व शिवमती निकिता देसाई मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कृषी विभाग नोडल अधिकारी ज्योती चोरे अध्यक्षस्थानी असतील.
तिसऱ्या सत्रात दुपारी दोन ते आठ या कालावधीत 'स्त्री सत्ता मातृदेवता परंपरा आणि प्रेरणा' या विषयावर शिवमती डॉक्टर स्नेहा टोपे व यशस्वी इतिहास संशोधक साहेबराव खंदारे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष देसाई असतील. चौथ्या व समारोप सत्रात (First Divisional Convention of Jijau Brigade) मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा माधुरी भदाणे-पवार, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, स्नेहा खेडकर यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहण्याची माहिती पाटील यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या