माधुरी कोल्हापुरातून जाताना रडली, हत्तीला रडू आलं तर तो दु:खी असतो का? हत्ती कशामुळे रडतात?
Madhuri Elephant cry : हत्तीला रडू आलं तर तो दु:खी असतो का? हत्ती कशामुळे रडतात? त्याला दु:ख झालं तर तो काय करतो? याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Madhuri Elephant cry : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात एका हत्तीचा सांभाळ करण्यात येत होता. कित्येक वर्ष या मठात हत्ती होता. दरम्यान, महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप 'पेटा'ने केला. पेटाने हा हत्ती योग्य ठिकाणी नेण्यात यावा, अशी मागणी देखील केली. त्यामुळे तेथील हत्तीबाबतचं हे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापित Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. या ठिकाणी ही हत्तीण नेण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर नांदणी गावातील लोकांनी भावूक होऊन हत्तीणीला निरोप दिला. मात्र, जाताना ही हत्तीच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. त्यामुळे कोल्हापूर सोडून जाताना हत्तीला अश्रू अनावर झाल्याची चर्चा सुरु झाली. हत्तीला रडू आलं तर तो दु:खी असतो का? हत्ती कशामुळे रडतात? त्याला दु:ख झालं तर तो काय करतो? याबाबतची माहिती जाणून घेऊयात..
View this post on Instagram
हत्तींच्या डोळ्यातून पाणी येताना दिसणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असू शकते. डॉ. Caitlin O’Connell (Stanford University) यांच्या मते, हत्तींच्या डोळ्यातून येणारे अश्रू अनेकदा धूळ, उष्णता, किंवा डोळ्यांचा त्रास यामुळे असतात, आणि ते नेहमीच भावनिक प्रतिक्रिया दर्शवतात असं म्हणता येत नाही. (Source: Smithsonian Magazine, 2014)
हत्तींची भावना आणि शोक
हत्ती हा कळपात राहाणारा प्राणी आहे. ते आपल्या कळपातील सदस्यांशी खोल भावनिक संबंध ठेवतात. हत्ती शोक व्यक्त करतात हे Dr. Joyce Poole यांच्या संशोधनातून समोर आलं आहे. त्यांच्या ElephantVoices.org या संस्थेच्या निरीक्षणांनुसार, हत्ती मृत साथीदाराच्या आसपास दीर्घकाळ थांबतात, त्याठिकाणी सोंड लावतात. हे वर्तन शोकाच्या जवळचं मानलं जातं.
आरशात स्वतःला ओखळू शकतात
हत्ती स्वतःला आरशात ओळखू शकतात, असं Dr. Frans de Waal यांचं संशोधन सांगतं. हा "self-awareness" चाचणी पास करणारा हत्ती हा काही मोजक्या प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळेच हत्ती दुःख, आनंद, सहवेदना यांसारख्या भावना अनुभवतात, असं वैज्ञानिक मानतात. (Source: de Waal, "Are We Smart Enough to Know How Smart Animals Are?", 2016)
भावनिक बंध आणि मानवी संपर्क
पाळीव किंवा प्रशिक्षित हत्ती जेव्हा आपल्या प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीपासून हत्ती दूर जातात, तेव्हा त्यांच्यात अस्वस्थपणा किंवा शांतपणा दिसून येतो. काही वेळा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. जे भावनिक प्रतिक्रिया मानलं जातं. मात्र, हे अद्यापही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होण्याच्या टप्प्यात आहे.
हत्ती रडतात पण नेहमीच भावनिक कारणामुळे नाहीत
हत्तींच्या डोळ्यातून अश्रू येणं हे केवळ दुःखद कारणामुळे होतं असं नाही. ते शारीरिक कारणांमुळेही अश्रू ढाळतात, पण काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्यांच्या भावनात्मक प्रतिक्रियाही दिसून येतात. त्यांच्या वर्तनातून दिसणारी समजूतदारपणा आणि सामाजिक जाणीव ही मानवासारखी वाटत असली, तरीही ती एक वेगळी जैविक प्रक्रिया आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या
Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
























