Hasan Mushrif on Kolhapur Loksabha: कोल्हापूरच्या शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, हसन मुश्रीफ म्हणाले, उद्धव ठाकरे साहेबांना...
Hasan Mushrif on Kolhapur Loksabha: राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी जाहीर मागणी केली.
Hasan Mushrif on Kolhapur Loksabha: कोल्हापुरातील शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी जाहीर मागणी केली.
हसन मुश्रीफ बोलताना यावेळी म्हणाले की, उद्धव ठाकरे साहेब यांना समजावून सांगितले पाहिजे की, कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण जिंकू शकतो असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यांनी सांगितले की शिवसेनेचे 2019 मध्ये जितके आमदार निवडून आले होते ते आता नाहीत. उलट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे नेहमी राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळावा. मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना इतर मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, सध्या सरकार चुकीचे काम करत असल्याने त्याची माहिती नागरिकांना द्यावी. सगळ्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याने आता फक्त माणसं जोडण्याचं काम करावं. जोपर्यंत लोकांची सेवा करणा नाही, तोपर्यंत नागरिक आपल्याशी जोडले जाणार नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, 100 नागरिकांमागे एक बूथ प्रमुख अशी यंत्रणा केली आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास आगामगी लोकसभा विधानसभा निवडणुकीत 100 टक्के विजयी होऊ शकतो. लोकांच्या मनामध्ये किती रोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळे काही होऊ शकतं हे कर्नाटक निकालामधून दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी उपक्रम हातात घेतला आहे, पण बदलीसाठी अधिकारी दोन दोन कोटी मोजत असेल, तर शासन आपल्या दारी न्या नाही तर बेडरूममध्ये न्या काही बदल होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या