(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : कोल्हापुरात गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये आतापर्यंत 9 जणांच्या मुसक्या आवळल्या; चार तालुक्यांमधून नराधमांना उचलले
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण समोर आल्यानंतर पाच तालुक्यांमध्ये पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 9 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Kolhapur illegal sex determination racket : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी 17 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी बोगस डॉक्टर श्रीमंत पाटील (रा. परिते. ता. करवीर) मदतनीस दत्तात्रय पाटील (रा. शिरसे ता. राधानगरी) आणि सुनील ढेरे (रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी गेल्या पाच दिवसांपासून या रॅकेटमध्ये (Kolhapur illegal sex determination racket) 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, कागल आणि भुदरगड आणि हातकणंगले याच पाच तालुक्यांमध्ये पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह 9 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी अन्य एका कारवाईत भुदरगड तालुक्यातील मडिलगे खूर्दमध्ये आपल्या घरातच गर्भलिंग चाचणी करत असताना विजय लक्ष्मण कोळस्करला ताब्यात घेतले होते.
गेल्या चार दिवसांपासून अटकेची कारवाई
आज भुदरगड पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. अमोल सुरेंद्र सुर्वे (वय 42, रा. रुई, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तत्पूर्वी, शनिवारी सर्जेराव अशोक पाटील (वय 32 रा. शिरसे, ता. राधानगरी) या एजंटला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दोन संशयितांना भुदरगड पोलिसांनी अटक केली होती. दिगंबर मारुती किल्लेदार (वय 43) आणि शीला शामराव माने (वय 40, दोघेही रा. तिटवे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. तत्पूर्वी, गुरुवारी इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर बाबूराव दत्तू पाटील (वय 52, रा. बामणे, ता. कागल) सागर शिवाजी बचाटे (वय 39, रा. सोनाळी, ता. कागल) या दोघांना उचलले होते.
दरम्यान, मंगळवारी (Kolhapur illegal sex determination racket) अन्य एका कारवाईत मडिलगे खूर्दमध्ये आपल्या घरातच गर्भलिंग चाचणी करत असताना विजय लक्ष्मण कोळस्करला ताब्यात घेतले होते. पोलिस व आरोग्य पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई कार, सोनोग्राफी मशीन, गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. बोगस डाॅक्टर श्रीमंत पाटील हा माजगाव फाट्यावरच्या ओढ्याजवळ गर्भलिंग चाचणी करत असताना तेथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले होते.
अन्य दुसऱ्या कारवाईत कोळस्करकडे चाचणीसाठी एका महिलेला पाठविण्यात आले होते. यावेळी चाचणीसाठी 14 हजार रुपये देण्याचे ठरले. तो आपल्या घरीच चाचणी करत असताना आरोग्य पथकातील गौरी पाटील, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी आनंद वर्धन व पोलिसांनी गर्भलिंग निदान चाचणी करताना कोळसकरला रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, विजय कोळस्कर हा बारावी नापास असून एमआयडीसीमध्ये नोकरी करत होता. (Kolhapur illegal sex determination racket)
इतर महत्वाच्या बातम्या