Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार; सोमवारीसुद्धा अपुऱ्या दाबाने पुरवठा होणार
बालिंगा, नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे बालिंगा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये रविवारी पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
Kolhapur Municipal Corporation : बालिंगा पाणी उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक कामकाज रविवारी (19 मार्च) कामकाज पूर्ण होईपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बालिंगा आण नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे बालिंगा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये रविवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच सोमवारी 20 मार्च होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरातील फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशरचौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वरगल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, संपूर्ण मंगळवार पेठ काही भाग. सी, डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपूरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, ई वॉडअंतर्गत खानविलकर पेट्रेाल पंप परिसर, शाहूपूरी 5,6,7,8 वी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक इत्यादी भागातील नागरिकांना रविवारी पाणीपुरवठा होणार नाही.
या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे अंतर्गत 45 नळ कनेक्शन खंडीत
दरम्यान, शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत 45 नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. थकबाकीपोटी 3 लाख 45 हजार 851 रुपये इतकी थकीत रक्कम वसूल करण्यात आली. वसुलीची कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वसुली मोहीम पुढेही सुरु राहणार असल्याने सर्व खासगी तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत व सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या