Kolhapur News : गावच्या रस्त्यासाठी इंजिनिअर तरुणाचा एल्गार; आमरण उपोषणाला बसलेल्या तरुणाची प्रकृती ढासळली
Kolhapur News : गावातील अवघा 700 मीटर रस्त्याला निधी मंजूर होऊनही गेल्या 330 दिवसांपासून काम सुरु करण्यात न आल्याने आमरण उपोषणाचा मार्ग इंजिनिअर तरुणाने अवलंबला आहे.
Kolhapur News : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शिरोळ (Shirol) तालुक्यातील नांदणी गावच्या इंजिनिअर रोहन मगदुम तरुणाने व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारला आहे. गावातील अवघा 700 मीटर रस्त्याला निधी मंजूर होऊनही गेल्या 330 दिवसांपासून काम सुरु करण्यात न आल्याने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही अजून प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 700 मीटर रस्त्यासाठी 24 लाख कोठे घालायचा याचा ताळमेळ लागत नाही, असेही अजब उत्तर या तरुणाला मिळाले आहे.
रोहन का बसला उपोषणाला?
नांदणीमधील हुवाज मळा ते बसवेश्वर मंदिर या अवघ्या 600 मीटर रस्त्यासाठी 24 लाख रुपयांचा निधी 22 मार्च 2022 रोजी निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्या फंडातून हा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, गेल्या 11 महिन्यांपासून काहीही काम झालेलं नाही. या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असल्याने अनेक अपघात झाले आहेत. चालताही येत नाही. या रस्त्याचा आमदार, बीडीओ, ग्रामपंचायत अशा कोणाकडूनही या रस्त्याची दखल घेण्यात आलेली नाही. कोणाकडेही गेल्यानंतर जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरु असतो, असे रोहनने म्हटले आहे.
Day 3
— Rohan Magdum 🇮🇳 (@RohanMagdum7) February 17, 2023
Blood Pressure down 🙃
Sugar Level down (50%)
Not a drop of water from last 58 hours
Energy Level: Up by 1000%#zukeganahi #justice pic.twitter.com/ULWDRgBYsW
या रस्त्यामुळे माझ्या वडिलांचे दोनवेळा ऑपरेशन झालं, मी सुद्धा चार पाचवेळा पडलो आहे. ग्रामस्थांनाही त्रास होत आहे. ग्रामपंचायतीनेही रस्त्यासाठी निधी मंजूर केला. तो निधी कुठे आहे? रस्त्याचे काम करायचं नाही असं ठरवलं आहे का? अशी विचारणा रोहनने केली आहे. रस्त्याची दुरावस्था कशी होत गेली, याची माहिती रोहनने क्युआर कोडमध्ये टाकली आहे. रस्त्याचे काम चालू होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही. बरं वाईट झाल्यास याला शासन जबाबदार असेल.
रोहनच्या उपस्थित केलेले प्रश्न
- नांदणी ग्रामपंचायत या रस्त्याची डागडूजी का करत नाही
- मंजूर 3 रस्त्यांपैकी 2 रस्त्यांची मोजणी इस्टीमेट तयार, मग बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा रस्त्याबद्दल दुजाभाव कशासाठी?
- माहितीच्या अधिकाराखाली रस्त्याच्या कामाची माहिती मागवल्यास ती नीट दिली जात नाही
- या मार्गावर नेतेमंडळीही अपघातग्रस्त झाले आहेत, तर मग ग्रामपंचायत रस्ता का करत नाही
इतर महत्वाच्या बातम्या