Maratha Reservation : कोल्हापुरात अजित पवारांसमोरच योगेश केदार आणि कार्यकर्त्यांचा राडा, मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत गोंधळ
Maratha Reservation : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातला.
कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोरच गोंधळ घातला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजलं. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण केले. त्यानंतर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ही बैठक कोल्हापुरातील समाजासाठी आहे की राज्यातील मराठा समाजासाठी आहे, असा जाब योगेश केदार आणि कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान अजित पवार यांच्यासोबत विचारला. सोबतच आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी टेबलवर हात आटपून गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
गोंधळामुळे बैठकीतलं वातावरण तापलं
त्यानंतर इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यादरम्यान योगेश केदार आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. त्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांना मी जागा सोडलीय का असा प्रश्न विचारला. या गोंधळामुळे आणि वादामुळे बैठकीचं वातावरण चांगलंच तापलं होतं.
बैठकीनंतर अजित पवार काय म्हणाले?
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, कोल्हापुरातील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. यावेळी विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्याच्यात वाद झाला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वांचं ऐकलं. इतर भागातील काही लोक आले होते. त्या शिष्टमंडळाचं कलेक्टर आणि एसपी यांच्या समवेत त्यांचं बोलणं ऐकलं, त्यावर मी ही माझी मत मांडली.
शिवाय मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "मराठा समाजाच्या नागरिकांशी आता समजून घेतलं आहे. मराठा समाजाच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही पण मराठा समाजाला मदत होईल याबाबत अनेक निर्णय घेतले आहेत."
VIDEO : Ajit Pawar Kolhapur : अजित पवारांसमोर प्रचंड राडा, मराठा आरक्षण बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ
हेही वाचा