एक्स्प्लोर

Kolhapur News: नरेंद्र मोदींना 2024 मध्ये पुन्हा पीएम करण्यासाठी जोमाने कामाला लागावे; भाजपच्या आढावा बैठकीत कानमंत्र

Kolhapur News : 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केल्या.

कोल्हापूर : लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपची आज (11 ऑगस्ट) कोल्हापूर, हातकणंगले विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र प्रमुख माजी मंत्री बाळा भेगडे यांनी लोकसभा कोअर टीम व विधानसभा प्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना त्यांनी केल्या. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत जाणून घेतले. 

आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवमतदार नोंदणी, वॉर रूम, निवडणूक विश्लेषण, आगामी काळात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे पक्ष प्रवेश यांच्यासह मोदी @9 कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये झालेले घर घर संपर्क अभियान, व्यापारी संमेलन, प्रभावी व्यक्तींच्या भेटी, घर घर तिरंगा, मन की बात, मेरी माटी, मेरा देश, विभाजन विभीषिका, तिरंगा रेली, अशा सर्व गोष्टींचा बैठकीत आढावा घेण्यात आला. 

आगामी निवडणूक कोणासोबत लढवली जाईल याचा निर्णय प्रदेश स्तरावर प्रमुख नेतेमंडळी घेतील ,परंतु पक्ष संघटना जास्तीत जास्त मजबूत करून पक्षकार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेतील विधानसभा प्रमुखांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या संघटनात्मक कामांची माहिती यावेळी सांगितली.  

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी भरत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय जाधव, राहूल देसाई, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहूल चिकोडे, नाथाजी पाटील, सत्यजित कदम, सोनाली मगदुम, पृथ्वीराज यादव, अशोकराव माने, संजय पाटील, संग्रामसिंह कुपेकर, विजय भोजे, संदीप देसाई, संजय पाटील, विजया पाटील, प्रविण प्रभावळकर, किरण नकाते, भगवान काटे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर 

भाजपकडून बैठकांचा सिलसिला सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस निरीक्षक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन्ही मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी  उद्यापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. रविवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील करवीर, चंदगड, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, तालुकाध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. रविवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget