एक्स्प्लोर

Kolhapur News : दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात 1 एप्रिलपासून बदल; 'या' पर्यायी मार्गाचा वापर करता येणार

1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. 

Kolhapur News : देवगड-निपाणी-कलादगी मार्गावर हायब्रीड ॲन्युटी या योजनेतंर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या आणि लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. 

या पर्यायी मार्गाने वाहतूक करता येणार 

दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे हलक्या आणि लहान वाहनांसाठी बालिंगा-महेपाटी कोते-धामोड-शिरगाव-तारळे पडळी-कारीवडे-दाजीपूर-ओलवण या मार्गाचा वापर करता येईल. तसेच मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी आणि लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी (स्वरुप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग आणि कोकणातील वाहने फोंडा घाट-दाजीपूर-कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवावीत. 

तसेच अवजड आणि मोठी वाहतूक रस्त्यावरुन पूर्णपणे बंद करुन कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहे. कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळतिट्टा- आजरा - आंबोली - सावंतवाडी अशी वळविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी, अशा आवश्यक उपाययोजना पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, कोल्हापूर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कोल्हापूरला रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज'

गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर मुंबईला जाणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दिल्ली मुख्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील महिन्यापासून कोल्हापूर निजामुद्दीन, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेस, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला जादा बोगी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा कोल्हापूरसह सांगली मिरज शहरातील प्रवाशांना होणार आहे. सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेसला तीन जादा बोगी आणि कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेसला तीन जादा बोगी, कोल्हापूर मुंबई कोयना एक्स्प्रेसला तीन जनरल बोगी, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला दोन स्लीपर डबे, दोन एसी थ्री टायर बोगी आणि कोल्हापूर नागपूर एक्स्प्रेसला एक जादा बोगी लावण्याचा सदस्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Bhausingji Road Kolhapur : शाहू महाराजांच्या जिगरी दोस्ताची आठवण म्हणजे, कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोड! जुन्या राजवाडा समोरच्या रस्त्याला हे नाव कसं पडलं माहीतीये का? 

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget