एक्स्प्लोर

कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पुणे पथकानं मोठी कारवाई केली आहे. चंदगडच्या हाजगोळीमध्ये MD बनवणाऱ्या कारखान्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पुणे पथकानं मोठी कारवाई केली आहे. चंदगडच्या हाजगोळीमध्ये MD बनवणाऱ्या कारखान्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत अंदाजे 100 कोटी किंमतीचे 50 किलो MD ड्रग्स जप्त केले आहे. MD ड्रग्स निर्मितीसाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील साहित्य आणि रसायने देखील जप्त करण्यात आली आहेत. ग्रामीण आणि सीमावर्ती भागात MD निर्मितीचा गोरखधंदा सुरु होता. दरम्यान, या कारवाईने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

MD तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनेही जप्त, सहा जणांना घेतलं ताब्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे MD ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, पुणे पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 100 कोटी किंमतीचे 50 किलो MD जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण आणि सीमावर्ती भागात हा ड्रग्स निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान MD तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य आणि रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध ड्रग्स निर्मितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कारखान्यामागे नेमके कोण आहेत, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात या कारवाईमुळं मोठी खळबळ

कारखान्यातून MD निर्मितीसाठी वापरले जात असलेले विविध कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर, ड्रिलसदृश मशीन आणि मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. यावर अधिकृतपणे संबंधित विभागाकडून अध्याप माहिती मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात या कारवाईमुळं मोठी खळबळ उडाली आहे.

 ड्रग्ज उत्पादनाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यावर भर : गृहराज्यमंत्री योगेश कदम 

दरम्यान, ड्रग्जविरोधी कारवायांना सरकारचे विशेष प्राधान्य असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. प्रशासनाकडून ड्रग्जविरोधी कारवायांकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे योगेश कदम म्हणाले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री स्तरावर देखील नुकतीच ड्रग्जविरोधी कारवाईचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मंत्री योगेश कदम यांनी दिली. ड्रग्जची विक्री होणारी ठिकाणेच नव्हे, तर ड्रग्ज उत्पादनाची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ड्रग्जच्या मुळावर घाव घालण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे कदम म्हणाले.
 
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget