Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Kolhapur News: कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी 'सोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ' असा आग्रह धरल्याचा सुद्धा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

Kolhapur Crime: कोल्हापुरात सत्ताधारी महायुतीच्या महिला नगरसेविकेसोबत विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर कोल्हापुरात राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिला नगरसेविकेनं जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नगरसेविकेने तक्रार दाखल केल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित व्यक्ती सातत्याने अश्लील शिवीगाळ करून धमकी देत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी 'सोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ' असा आग्रह धरल्याचा सुद्धा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
लग्नाच्या आमिषाने गायिकेवर लैंगिक अत्याचार
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून ओळखीच्या तरुणीवर वारंवार अत्याचार आणि मारहाण केल्याच्या तक्रारीवरून तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. अक्षय भरत फाळके असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणीने फाळके याची आई, बहीण आणि भावाने फोनवरून शिवीगाळ करून घरात घुसून मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता हॉटेलमध्ये गायनाचे काम करते. तिची गेल्या आठ नऊ वर्षांपासून अक्षयशी ओळख होती. पीडित तरुणी कामासाठी मुंबईला गेल्यानंतर 2025 मध्ये सोशल मीडियावरील फोटो पाहून अक्षयने तिचा मोबाइल क्रमांक मिळवून संपर्क केला. दोघांत मैत्री झाल्यानंतर तरुणीशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. अक्षयने पीडित तरुणीला जेवणाचे आमंत्रण देत एका हॉटेलमध्ये नेल्यानंतर मद्यपान करून पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर स्वतःच्या कारमधून ठिकठिकाणी घेऊन जाऊन पाचवेळा अत्याचार केला.
इतर महत्वाच्या बातम्या





















