एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपाकडून राजर्षी शाहू राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन; खासबाग मैदानात थरार रंगणार 

Kolhapur: दोन जूनपासून खासबाग मैदानात कुस्तीचा थरार रंगणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील (86 किलोवर) विजेत्याला एक लाखाचे तर महिलांच्या खुल्या गटातील (60 किलोवर) विजेत्यास 50 हजारांचे बक्षीस आहे.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेकडून  कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने तसेच सहकार्याने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पुरूष व महिला कुस्तीपटूंसाठी राज्यस्तरीय राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन जूनपासून खासबाग मैदानात कुस्तीचा थरार रंगणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील (86 किलोवर) विजेत्याला एक लाखाचे तर महिलांच्या खुल्या गटातील (60 किलोवर) विजेत्यास 50 हजारांचे बक्षीस आहे. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात ही स्पर्धा होणार आहे. 

विजयी मल्लांना 5 लाख 71 हजारांवर रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र

पुरूष गटात आठ व महिला गटात वजन गटात स्पर्धा होणार आहेत. पुरूष खुला गट राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा व महिला गटात राजर्षी शाहू महिला केसरी स्पर्धा होणार आहे. विजयी मल्लांना 5 लाख 71 हजारांवर रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. चार जूनला खुल्या गटात मैदानी काटा जोड कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे व राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता शैलेश शेळके यांच्यात निकाली कुस्ती होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

कुस्तीपटूंवर बक्षिसांचा वर्षाव

पुरूषांच्या 57 किलो गटासाठी प्रथम बक्षीस 7 हजार, 61 किलोसाठी 10 हजार, 65 किलोसाठी साडेबारा हजार, 70 किलो व 74 किलोसाठी 15 हजार, 79 किलोसाठी 20 हजार, 86 किलोसाठी २५ हजार बक्षीस आहे. महिला गटातील 55 किलोसाठी 10 हजार, 60 किलोसाठी 15 हजारांचे बक्षीस आहे. पुरूष गटासाठी एकूण 4 लाख 36 हजारांची तर महिला गटासाठी एक लाख 35 हजारांची बक्षीसे आहेत.

महिला गटात दोन वजन गट वाढवले 

महिला गटामध्ये 36 किलो वजनगट, 40 किलो वजनगट व 45 किलो वजन गटामध्ये काही स्पर्धक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास उत्सुक असलेने या वजन गटांचाही समावेश करण्यात आला आहे. 36 ते 45 वजन गटाचा प्रथमच समावेश करण्यात आल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. स्पर्धेबाबतची माहिती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, सचिव अशोक पोवार, माजी महापौर आर. के. पोवार, विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर, अंजली जाधव, नामदेव मोळे तसेच उपायुक्त रविकांत आडसूळ, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget