एक्स्प्लोर

Shahu Maharaj: कोल्हापूर टार्गेट आहे, मात्र कोल्हापूरला कोणतीही गोळी लागू शकत नाही, कोल्हापूरचाच विचार पसरणार; शाहू महाजारांनी व्यक्त केला निर्धार

कोल्हापूरला तर टार्गेट केलं आहे. मात्र ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे, कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.

Shahu Maharaj: कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता तो लागला, पण आपण पुसून टाकू. दंगल केवळ कोल्हापुरात नाही संभाजीनगरमध्ये घडली, अहिल्यानगरमध्येही झाली. नाशिकमध्येही काही तरी घडलं. कोल्हापूरला तर टार्गेट केल आहे. मात्र, ते टार्गेट त्यांच्यासाठी कठीण आहे कोल्हापूरला कोणतीही गोळी लागणार नाही, असा निर्धार शिव शाहू सद्भावना रॅलीनंतर झालेल्या सभेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी बोलून दाखवला.

राज्याला पुरोगामी वारसा देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत 7 जून रोजी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी राजर्षी शाहू सलोखा मंचकडून शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीनंतर झालेल्या सभेत छत्रपती शाहू महाराज यांनी आपले परखड मत व्यक्त करताना गेल्या 100 वर्षात कोल्हापूरला डाग लागला नाही तो 7 जून रोजी लागल्याचे म्हणाले. 

कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता 

शाहू महाराज म्हणाले की, कोल्हापूरला 100 वर्षात जो डाग लागला नव्हता तो लागला, पण तो आपण पुसून टाकू. 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात झाला त्याच दिवशी स्टेट्स प्रकरण घडले.  पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले. ती मुलं अल्पवयीन होती. मात्र, त्यांना माफ करता येतं नाही आणि त्यांच्या पालकांनाही माफ करता येतं नाही. कारण त्यांनी त्या मुलांना योग्य संस्कार केले नाहीत. तसेच आणि कोणी त्यांना स्टेटस ठेवायला लावले का? याचाही तपास झाला पाहिजे. मात्र, त्यानंतरही काही तरुणांनी सर्व लोकांना जबाबदार धरले. दुसऱ्या दिवशी जर सतर्क राहिले असते, तर घडले नसते. मात्र, कोल्हापूरला लागलेला हा डाग आपण लवकरात लवकर पुसून टाकू आणि आपण लवकरात सुखाने नांदू. 

समतेचा विचार पुढे नेऊया 

त्यांनी पुढे सांगितले की, मात्र जी मंडळी अशा वातावरणाला खतपाणी घालतात त्यांच्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. कोल्हापुरात सातत्याने एकोप्यचे वातावरण राहिलं आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात मानवता, समतेचं वातावरण निर्माण केलेलं वातावरण बिघडू पाहतात. त्यामुळे काही युवक दिशाभूल झाले होते. मात्र, ते युवक आता रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने येणार नाहीत. त्यांना इतिहास समजला असेल. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यसोबतही एकत्र आहेत. युवकांना चुकीचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे हे घडते. यासाठी चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून नेत्यांनी लक्ष ठेवणे गरजेचं आहे. हा सलोख्याचा विचार देशभर पोहचला पाहिजे कारण जे कोल्हापुरात घडतं ते सर्वत्र घडतं. समतेचा विचार पुढे नेऊया आणि कृतीतून तो पुढे नेला पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget