एक्स्प्लोर

Kolhapur Crime: लाचखोर विभागीय शिक्षण सहसंचालकासह तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; अहवालासाठी 30 हजार घेताना कार्यालयात कारवाई

Kolhapur Crime: हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी पन्नास हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारताना कारवाई झाली.

Kolhapur Crime: विभागीय शिक्षण सहसंचालकासह (उच्च शिक्षण) स्टेनोग्राफर आणि कनिष्‍ठ लिपिक कोल्हापुरात (Kolhapur News) ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकले आहेत. या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना बुधवारी 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई राजाराम कॉलेज परिसरातील विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये करण्यात आल्याने खळबळ उडाली. हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी पन्नास हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारताना कारवाई झाली.

लाचखोर हेमंत नाना कठरे हा वर्ग एकचा अधिकारी

विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) हेमंत नाना कठरे (वय 46, सध्या रा. अंबाई डिफेन्स, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय 32, रा. पीरवाडी, ता. करवीर) आणि कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय 34, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विभागीय सहसंचालक कार्यालयात विविध कामांसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, प्राचार्य येतात. याठिकाणी कार्यालयामध्ये लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. लाचखोर हेमंत नाना कठरे हा वर्ग एकचा अधिकारी आहे. 

सांगली जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या दोन अभ्यासक्रमांसाठी या विभागाकडून अभिप्राय द्यावा लागतो. यामध्ये सर्व नियम-अटींची पूर्तता केल्याचा अहवाल देण्यासाठी कठरे यांनी 50 हजार रुपये मागितल्याची माहिती तक्रारदाराने एसीबीकडे दिली. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. तडजोडीअंती आज 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना विभागीय शिक्षण सहसंचालक, स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने पकडले.

उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या तक्रारीची खातरजमा मंगळवारीही केली होती. आज खुद्द वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्याचीही खात्री केली. दुपारी सहसंचालक कार्यालयात सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक जोंग याला पकडले. या रकमेची मागणी सहसंचालक कठरे आणि स्टेनोग्राफर गुरव यांनी केल्याचे स्पष्ट होताच तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भंडारे यांच्‍यासह विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील आदी कारवाईत सहभागी होते.

घरांची झडती

दरम्यान, लाचखोर अधिकारी वर्ग एकमधील असल्याने त्याच्यासह इतर दोघांना अटक करून त्यांच्या घराची झडती घ्यायची असल्याने एसीबीकडून सांगली विभागातील अधिकाऱ्यांनाही कारवाई करण्यासाठी बोलावले होते. मुळ गाव सातारा जिल्ह्यातील असल्याने तेथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हेमंत कठरेच्या घराची झडती घेतली. कोल्हापुरातील अंबाई डिफेन्समधील घराच्या झडतीसह गुरव आणि जोंग यांच्याही घरांच्या झडती घेण्यात येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget