Kolhapur Crime: कोल्हापुरात आता कोंबडीचोरांचा उच्छाद! कोंबडी, कोंबड्यांची पिल्ली अन् अंडी खुरूड्यासकट लंपास; तक्रार करतानाही शेतकऱ्यांची कुचंबना
कोंबड्या चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे, शेडमध्ये दिसेल ते साहित्य चोरीला जात असल्याने तक्रार देताना संबंधित शेतकऱ्याची कुचंबना होत आहे.
Kolhapur Crime: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोनसाखळी चोर, दरोडेखोरांनी तसेच सशस्त्र दरोड्यांचा सिलसिला सुरु असताना आता भुरट्या चोऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे दुर्गम भागात कोंबडीपालन तसेच शेळी पालन करणारे शेतकरी संकटात आले आहेत. शाहुवाडी तालुक्यातील सरुडमध्ये बिरदेव माळ परिसरात सोमवारी रात्री भुरट्या चोरांनी 43 कोंबड्या आणि 40 कोंबडीची पिल्ली तसेच 50 अंडी ठेवलेल्या खुरुड्यासह लपांस केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून पशूधन, शेळ्या, कोंबड्या, शेती अवजारे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
सरुडमधील सुभाष रंगराव कुराडे आणि बळवंत तुकाराम कुराडे यांचे बिरदेव माळात कुक्कुटपालन शेड आहे. सुभाष कुराडे यांच्या शेडमधील 35 कोंबड्या दोन कोंबडे 40 कोंबडीची लहान पिल्ली तसेच शेडमध्ये असणारी 50 अंडी खुरुड्यासह चोरून नेली. तसेच बळवंत कुराडे यांच्या शेडमधील 5 कोंबड्या 1 कोंबडा तसेच 10 पिल्ली चोरीला गेली आहेत. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
तक्रार करायची तरी कशी?
एकाचवेळी अनेक कोंबड्या चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे शेतातील शेडमध्ये दिसेल ते साहित्य चोरीला जात असल्याने तक्रार देतानाही संबंधित शेतकऱ्याची कुचंबना होत आहे. अशा चोरींची तक्रार करायची तरी कशी? असा प्रश्न पडला आहे.
जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश
दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणांहून दुभत्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पाच लाखांवर किंमत असलेली जनावरे ताब्यात घेतली. जिल्ह्यातील सात गुन्हे संशयितांकडून उघडकीस आले आहेत. जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी युवराज मल्लाप्पा तेली (वय 24, मूळ गाव केंपवाड, ता.कागवाड, कर्नाटक, सध्या रा.इचलकरंजी), राहुल यमनाप्पा सनगुंडे (वय 22, रा.डेक्कन गल्ली, गल्ली नं. 1 इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
इचलकरंजीतील एका महिलेचाही या संशयितांमध्ये समावेश आहे. अजून त्या महिलेला अटक करण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात जनावरे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेली जनावरे पुन्हा परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तक्रारदारांकडून गुन्हे दाखल करण्यात येत होते. जयसिंगपूर पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवून तपास यंत्रणा गतिमान केली.पोलिसांनी युवराज मल्लाप्पा तेली (वय 24, मूळ गाव केंपवाड, ता.कागवाड, कर्नाटक, सध्या रा.इचलकरंजी), राहुल यमनाप्पा सनगुंडे (वय 22, रा.डेक्कन गल्ली, गल्ली नं. 1 इचलकरंजी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. इचलकरंजीतील एका महिलेचाही या संशयितांमध्ये समावेश आहे. अजून त्या महिलेला अटक करण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात जनावरे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, चोरीला गेलेली जनावरे पुन्हा परत मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या