एक्स्प्लोर

Kolhapur Crime : अनैतिक संबंधाचा संशय, मिटवामिटवीचा प्रयत्न, पण परतून जाताना वाद झाल्याने वन कर्मचाऱ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून 

Kolhapur Crime : मयत भास्कर कांबळे व संशयित आरोपी युवराज कांबळे मित्र होते. भास्करला युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात वाद झाला झाला होता.

कोल्हापूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्याने मिटवामिटवी करून घरी जात असताना पुन्हा वाद झाल्याने वन कर्मचाऱ्याचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात वारे वसाहतमध्ये महादेव मंदिरानजीक घडली. वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय 50, रा. आणाजे, ता. राधानगरी) याचा डोक्यात दगड घालून निघृर्ण खून केला. संशयित आरोपी भाजीपाला विक्रेता असलेला युवराज बळवंत कांबळे (वय 27 रा. कुडूत्री, ता. राधानगरी) याने निर्घृण खून केल्यानंतर पोलिसांत हजर झाला. दोघेही राधानगरी तालुक्यात असून सध्या ते भाड्याने वारे वसाहतमध्ये राहत होते. याठिकाणीच  बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.  

अनैतिक संबंध असल्याचा संशय  

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत भास्कर कांबळे व संशयित आरोपी युवराज कांबळे मित्र होते. त्यामुळे दोघेही वारे वसाहतमध्ये राहत असल्याने त्यांची ये-जा सुरु होती. भास्करला युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात वाद झाला झाला होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद होता. 

जीवे मारण्याची धमकी दिल्याने केला खून

दरम्यान, पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने युवराजशी वाद झाल्यानंतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या वादामुळे तो मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघेही संभाजीनगरमधील मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटवून परतून जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी झालेल्या झटापटीत गाडी सोडून भास्करने बाजूला असलेल्या शेताकडे पळत गेला. मात्र, त्याठिकाणी सुद्धा युवराजने त्याला गाठून भास्करच्या डोक्यात दगड घालून युवराजने ठार मारले.  त्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. भास्करला मी मारलं नसतं तर त्याने मला मारले असते. गेल्या काही दिवसांत तो माझ्या घरी येऊन कुटुंबीयांना त्रास देत होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. भास्करची पत्नी आणि युवराजची ओळख फेसबुकवरून झाली होती. दोघेही जवळच्या गावात राहत असल्याने मैत्री वाढली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget