Kolhapur Crime : कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच; आता बारावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या
Kolhapur Crime : कोल्हापूरह जिल्ह्यात सलग आत्हमत्यांचे सत्र सुरुच आहे. ताज्या घटनेमध्ये कोल्हापूर शहराला लागून असलेल्या मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली.
Kolhapur Crime : कोल्हापूरह जिल्ह्यात सलग आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. ताज्या घटनेमध्ये कोल्हापूर शहराला लागून असलेल्या मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मोरेवाडी परिसरातील कोरेनगरमधील लीया अमित रुकडीकर (वय 18) हिने आज घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे. ती बारावीची परीक्षा देत होती. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याचा अधिक तपास घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी फोन केल्यानंतर लीयाने तब्येत बरं वाटत नसल्याचे सांगितले. आई वृषाली शिक्षिका असल्याने शाळेत गेल्या होत्या. तिच्यासोबत घरी फक्त आजी होती. झोपायला जाते म्हणून सांगून लीया बेडरूममध्ये गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर औषधे घेण्यासाठी तिला बोलविले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांनी दरवाजा ढकलून कडी तोडून खोलीत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला.
कोल्हापुरात जानेवारीत तब्बल 75 आत्महत्या
कोल्हापुरात आत्महत्यांचे सत्र सुरुच असल्याने कोल्हापूर पोलिसांकडून आता पुढाकार घेत प्रबोधनाचा जागर करण्यात येत आहे. दिवसाला दोन आत्महत्या होत असल्याने अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी प्रबोधनाची मालिका सुरु केली आहे. ‘जीवन सुंदर आहे, त्याचा उपभोग घ्या, सकारात्मक विचारांनी नैराश्य टाळा, असे संदेश देण्यात येणार आहे. निर्भया पथक, स्थानिक पोलिस ठाणे, पोलिस उपअधीक्षक यांच्या सहकार्याने 101 ठिकाणी व्याख्याने देण्याचा त्यांचा मानस आहे. याची सुरुवातही त्यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 75 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे दिवसाला दोन आत्महत्या होत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून आत्महत्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे देसाई यांनी या आत्महत्या रोखायला पाहिजेत, यासाठी त्यांच्या स्तरावर प्रबोधनाचा जागर करण्याचा मानस केला. आतापर्यंत कुंभोज, राधानगरी, कोल्हापुरातील शाळा कॉलेजमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या