Sanjay Raut : उद्धव ठाकरे आव्हान वाटल्याने शिवसेना फोडली, आता निवडणुका घ्या, 150 जागा आम्ही जिंकू; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान त्यांनी दिले.
Sanjay Raut : उद्धव ठाकरे आव्हान वाटत आहेत म्हणून यांनी शिवसेना फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसंच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी वाटली नाही? इतके बेईमान कसे झाला? असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शिवगर्जना मेळाव्यात भाजप, शिंदे गटावर सडकून टीकास्त्र सोडले. हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा, अशा शब्दात राऊतांनी हक्कभंगावरुन हल्लाबोल केला. कोल्हापूर छत्रपती शाहूंची भूमी आहे, कडवट इमानदारांची भूमी आहे. कोल्हापुरातील संदेश राज्यात जातो. पुन्हा एकदा शिवसेनेचं नंदनवन होईल, पानगळ झाल्याशिवाय वसंत बहरत नाही, असेही ते म्हणाले.
आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. कायद्याने नाव, चिन्ह आपल्याकडे नाही तरीही तुम्ही आला हेच आपलं भांडवल आहे. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हानही राऊत यांनी दिले. तुमचं, मन, आत्मा तुम्ही विकला आहात. काय कमी केलं शिवसेनेनं? खोके दिलं नाहीत, पण मान सन्मान दिला. भाव वाढवला, अदानीसारखा भाव खाली आला नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
40 गद्दारांनी धडे देऊ नयेत, त्यांची राजकीय अंत्ययात्रा निघणार
संजय राऊत म्हणाले की, "40 गद्दारांनी धडे देऊ नयेत. त्यांची राजकीय अंत्ययात्रा निघणार आहे. शिवगर्जना राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, अमित शाह आले होते कोल्हापुरात, मोगँबो खूश होकर गया क्या? आणखी काही बोलायला नको, नाही तर आणि परत हक्कभंग आणतील. शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळणं हा सत्याचा विजय आहे असे अमित शाह (Amit Shah) कोल्हापुरात म्हणाले होते. त्यावरुन राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, हा सत्याचा विजय म्हणत आहात. तुम्हाला काय सत्य माहित? सत्य 2024 ला कळेल. दिल्ली महाराष्ट्रात आमचं राज्य असेल. गद्दारांच्या हातात महाराष्ट्र देता, त्यांच्या हातात चाव्या देता. तुम्ही वाघाच्या शेपटीवर पाय दिला आहे. हा जखमी झालेला वाघ आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "सर्वोच्च न्यायालयात काय होतं ते पाहू. निवडणूक आयोगाने गद्दारांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर राज्यात आक्रोश झाला. या शिवसेनेसाठी शेकडोंनी बलिदान दिलं. बाळासाहेबांचा आत्मा गद्दाराच्या हातात देताना लाज वाटली नाही? उद्धव ठाकरे आव्हान वाटत आहेत म्हणून यांनी शिवसेना फोडली. त्यांना मुंबई गिळायची आहे, मराठी माणसाच्या ताब्यातून काढून घ्यायची आहे. महाराष्ट्राला कंगाल करायचं आहे."
इतर महत्वाच्या बातम्या