Kirit Somaiya on Hasan Mushrif : किरीट सोमय्या कोल्हापुरात पोहोचताच म्हणाले, मुश्रीफांचा 500 कोटींचा घोटाळा; गरीब शेतकऱ्यांसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा करणार नाही
Kirit Somaiya on Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कुटुबीयांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, पण 500 कोटींचे आकडे बाहेर यायला लागले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
Kirit Somaiya on Hasan Mushrif : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya in Kolhapur) यांनी कोल्हापुरात (Kolhapur News) पोहोचताच मोठा दावा केला आहे. आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कुटुबीयांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, पण 500 कोटींचे आकडे बाहेर यायला लागले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेला सोडलं नाही, असाही आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या आज कोल्हापुरात आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचताच हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली. कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहुया...
सोमय्या म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणार आहे. दरम्यान, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्तिप्रदर्शन करत सोमय्यांचं स्वागत केलं.
जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकांची चौकशी
दरम्यान, सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला चुकीच्या पद्धतीने पैसे पुरवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा बँकेतून गडहिंग्लज कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला केलेला अर्थपुरवठाही वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि घोरपडे कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेवरही छापेमारी केली आहे. तसेच ‘ब्रिक्स’ला केलेल्या कर्जपुरवठ्याबद्दल बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे या तिघांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. बँकेच्या मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाशी संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यापूर्वी, ईडीकडून कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यापूर्वी, 11 जानेवारी रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना 2013-14 मध्ये ‘ब्रीक्स’ कंपनीने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला होता. 2015 पर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा घेतल्यानंतर 2015 नंतर त्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. या कालावधीत कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत ‘ईडी’चा आक्षेप आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :