(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya in Kolhapur : किरीट सोमय्यांकडून अंबाबाईचे दर्शन; म्हणाले, शक्ती मागण्यासाठी आलोय
Kirit Somaiya in Kolhapur : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
Kirit Somaiya in Kolhapur : हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीची (ED) छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर आले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने (Mahalaxmi Express) किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले. रेल्वे स्थानकावर त्यांनी पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून शक्ती मागण्यासाठी आलो आहे. कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली आहे. मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणी प्रभाव पाडू शकत नाही.
मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे. दरम्यान, माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना रंगला असतानाच रविवारी थेट व्हिडिओ व्हायरल करत किती छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते, याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 33 सेकंदाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करताना किरीट सोमय्या हे कशा पद्धतीने मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत आहेत हे दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
दुसरीकडे मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पायरी सुरू असतानाच आता समर्थकही आता आक्रमक झाले आहेत. शनिवारी मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने, सूर्यकांत पाटील यांच्यासह समर्थकांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावह हल्लाबोल केला. घाटगे फक्त जमिनीच्या तुकड्याचे वारसदार असल्याचे टीका करत मुश्रीफ राजर्षी शाहू महाराज विचारांचे वारसदार असल्याचा असल्याचे भैय्या माने म्हणाले. सूर्यकांत पाटील यांनीही घाटगे यांना जोरदार टोला लगावताना आम्ही तोंड उघडल्यास पळताभुई थोडी होईल, असा इशारा दिला.
इतर महत्वाच्या बातम्या