एक्स्प्लोर

Kiran Lohar : कोल्हापूर ते सोलापूर लाचखोरीचा 'किरण' अन् बायको आणि मुलाची सुद्धा साथ; आता कोट्यवधीची संपत्ती होणार जप्त!

Kiran Lohar : किरण लोहार लाचखोरी करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासत असताना त्याला परावृत्त करण्याऐवजी त्याला तोलामोलाची साथ देण्याचे काम त्याची बायको आणि मुलाकडूनही करण्यात आले.

कोल्हापूर/सोलापूर : कोल्हापूर ते सोलापूर फक्त वाद आणि वादच ओढवून घेतलेल्या आणि वाद निर्माण केलेला तत्कालिन सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहारला (Kiran Lohar) 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात अडकल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. बेहिशेबी कोट्यवधींची संपत्ती समोर आल्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाने किरण लोहारसह तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे या दोन अधिकाऱ्यांविरोधातही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरीत अडकलेला किरण लोहार ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर सर्वाधिक चर्चेत आला होता. 

किरण लोहार लाचखोरी करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासत असताना त्याला परावृत्त करण्याऐवजी त्याला तोलामोलाची साथ देण्याचे काम त्याची बायको आणि मुलाकडूनही करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

किरण लोहारच्या कोल्हापुरातील घराची झाडाझडती 

दरम्यान, किरण लोहारच्या कोल्हापुरातील पाचगाव येथील घराची झाडाझडती घेण्यात आली. काल बुधरावारी उशिरापर्यंत त्याच्या घरात झाडाझडती सुरू होती. त्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली त्याचबरोबर अन्य मालमत्तांवरही जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे. 

दरम्यान, किरण लोहारच्या घराच्या घेतलेल्या झडतीत चार कार मिळून आल्या. यामध्ये दोन कार किरण लोहारच्या नावावर आहेत, तर दोन कार अन्य नातेवाईकांच्या नावावर आहेत. मुंबईमधील प्लॉट, पुण्यातील फ्लॅट याचीही कागदपत्रे मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. लोहारने काही नातेवाईकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती नाळे यांनी दिली. 

5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अपसंपदा जमविली 

दरम्यान, किरण लोहारच्या चौकशीत समोर आलेल्या आकडेवारीने डोळे विस्फारले आहेत. किरण लोहारने भ्रष्ट व गैरमार्गाने अपसंपदा जमवली आहे. किरण लोहारसह पत्नी, मुलग्यावर सोलापुरातील सदर बझार पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण लोहारने परिक्षण कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अपसंपदा जमविली आहे. पत्नी व मुलगा निखिलने भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास मदत केली आहे. 

दरम्यान, किरण लोहारने स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ते स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतलं होतं. याच किरण लोहारने डिसले गुरुजींवर आरोप केले होते.

किरण लोहार कोल्हापूरमध्येही अत्यंत वादग्रस्त कारकिर्द 

किरण लोहार लाचखोरीच्या जाळ्यात सापडण्यापूर्वी 13 महिने अगोदर  सोलापूर जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काम केलं आहे. तथापि, कोल्हापूर जिल्हा परिषदेतही त्याच्या कामाची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहारवर पैसे घेतल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहारला कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला होता. सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने कारवाई करत माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. 

पीएच.डी आणि विद्यापीठाची सुद्धा चांगलीच चर्चा

किरण लोहार जिल्हा परिषदेतील कामाच्या पद्धतीवरून जितके वादग्रस्त ठरला, त्याच पद्धतीने त्याची पीएच.डी सुद्धा चांगलीच चर्चेत आली होती. त्याला एका खासगी विद्यापीठाने पीएच.डी दिल्यानंतर त्यांनी एकप्रकारे सूचनावजा फर्मान काढताना गावभर फलक लावण्यासाठी सांगितले होते. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी प्रदान करण्यात आली होती, पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले होते. टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget