एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा बँकेचे एमडी ए. बी. मानेंची राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड

देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. ए.बी. माने हे पहिलेच अधिकारी आहेत.

Kolhapur News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापकपदी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. ए. बी. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. बँकेने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासन व बोर्ड विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.

माने यांची निवड करण्यात आल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीत माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या. येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. रिझर्व बँक आणि नाबार्डच्या तज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलने मुलाखत घेतल्यानंतर माने यांची निवड निश्चित केली.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 25 वर्ष सेवा

गेल्या 25 वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्यांनी विविध पदांवर सेवा बजावली आहे. कृषी अधिकारी, बीडीएस विभागामध्ये प्रकल्प अधिकारी, सीएमए सेलचे उपव्यवस्थापक, तसेच अकाउंट्स बँकिंग, शेती कर्जे, प्रशासन, सीएमए सेल, वसुली, ऑडिट,  माहिती तंत्रज्ञान या विभागांचे व्यवस्थापक अशा विविध विभागात वरिष्ठ पदांवर  काम केले आहे. 2014 मध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व 2018 पासून नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. 31 मार्च 2023 रोजी वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बँकेने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.

माने यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर झाल्यानंतर त्यांनी धारवाडच्या कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राहुरी येथील महात्मा कृषी फुले कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. केली आहे. रिझर्व बँकेच्या पुणेस्थीत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बँकिंगमधून त्यांनी 'ग्रामीण विकास प्रकल्प' ही पदविकाही घेतली आहे. रिझर्व बँकेने बँकिंग क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या पुणे येथील राष्ट्रीय बँकिंग प्रबंधन संस्थेमध्ये त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून काम केले आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग या संस्थेचे ते सर्टिफाईड असोसिएट आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथील व्यावसायिकता विकास संस्थेमध्ये त्यांनी फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget