एक्स्प्लोर

Kagal : कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; कट्टर विरोधक मुश्रीफ-समरजीत घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी

Kagal Nagarpalika Election : राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन निवडणूक लढणार होते. मात्र 24 तासामध्येच मोठ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत.

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता दोन्ही राष्ट्रवादींचा चंदगड पॅटर्न (Chandgad Pattern) पुढे जाताना दिसतोय. चंदगड नंतर आता हायहोल्टेज लढत असलेल्या कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे (Samarjeet Ghatge) यांची आघाडी झाली आहे. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजीत घाटगे गटाला असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. पण यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिकांचा गट मात्र आता एकाकी पडल्याचं दिसून आलं.

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत 24 तासांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मंडलिक एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या एक-दोन दिवसात अंतिम फॉर्म्युलाही जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. 

चंदगड पॅटर्न राबवून दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणण्यात यश आलेल्या हसन मुश्रीफ यांना होम ग्राऊंडवरच घेरण्याची रणनीती आखण्यात आली होती. घाटगे आणि मंडलिक एकत्र येण्याच्या शक्यतेने कागलची वाट मुश्रीफांसाठी खडतर ठरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र हसन मुश्रीफ यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावत कट्टर विरोधक असलेल्या समरजित घाटगेंशी आघाडी केली

Kagal Nagarpalika Election : कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

मुश्रीफआणि समरजित घाटगे यांच्या आघाडीमुळे आता कागलचं राजकारण पूर्णपणे फिरल्याचं दिसून येतंय. कागलमध्ये या दोन्ही गटांची मोठी ताकद आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद हे मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद हे समरजित घाटगे गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

Kagal Election News : शिंदेंची शिवसेना काय करणार? 

कागलमध्ये ताकद असलेले मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे दोन्ही नेते एकत्र आल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांची मात्र गोची झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Kolhapur Chandgad Pattern : चंदगड पॅटर्न कायम

या आधी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याची किमया मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. तोच पॅटर्न आता कागलमध्येही राबवण्यात आला आहे. कागलमध्ये झालेल्या या आघाडीचा परिणाम हा कोल्हापुरातील इतर ठिकाणी तसेच राज्याच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget