Kolhapur News : जवान सुरज पवार यांचे कर्तव्यावर असताना निधन; कुटुबीयांकडून विधवा प्रथा बंदीचा क्रांतीकारी निर्णय
Kolhapur News : जवान सुरज पवार यांचे कर्तव्यावर असताना 25 जानेवारी लेह लडाखमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने शोकाकूल झाले असतानाही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेत सामाजिक भान दाखवून दिले आहे.
Kolhapur News : सामाजिक परिवर्तनाचा साक्षीदार राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाडने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेत राज्याला आदर्श घालून दिला होता. या निर्णयानंतर कागल तालुक्यातील नानीबाई चिखली गावाने ठराव करत एक पाऊल पुढे टाकले होते. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा त्याच गावातील जवानाच्या कुटुंबीयाने घेत क्रांतीकारी पाऊल टाकले आहे. जवान सुरज पवार यांचे कर्तव्यावर असताना 25 जानेवारी लेह लडाखमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने शोकाकूल झाले असतानाही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेत सामाजिक भान दाखवून दिले आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सुरज पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणे न काढण्याचा निर्णय कुटुबीयांनी घेतला आहे. ठरावानंतर असा निर्णय घेणारे जवान सुरज पवार यांचे पहिलेच कुटुंब आहे. हा निर्णय पोवार कुटुंबातील महिलांसाठी लागू राहणार असल्याचे आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव पोवार यांनी सांगितले.
सरपंचाकडून निर्णयाचे स्वागत
दरम्यान, पोवार कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आल्यानंतर या निर्णयाची माहिती नानीबाई चिखलीचे सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांना देण्यात आली. त्यांनी पवार यांच्या कुटुंबीयांचे ग्रामपंचायतीकडून अभिनंदन केले.
हेरवाडने दिला आदर्श
जिल्ह्यातील हेरवाड गावाने गावातील विधवांना सन्मानाचं जीवन जगता यावं, यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला होता. पतीच्या निधनानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जातं, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडलं जातं, जोडवी काढली जातात. आता ही प्रथा हेडवाडमध्ये बंद करण्यात आली आहे.
कोल्हापुरात मुलानं लावून दिलं विधवा आईचं दुसरं लग्न
दुसरीकडे, कोल्हापूरने विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न घालून दिल्यानंतर आता या विधायक उपक्रमावर कळस ठरेल, असा आदर्श अवघ्या बारावी शिकलेल्या शिंगणापुरातील तरुणाने घालून दिल. वडिलांचे अकाली छत्र हरवल्यानंतर युवराज शेले या तरुणाने आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसण्यासाठी दुसरा विवाह लावून दिला. गावात राहत असूनही त्याने गावच्या लोकांची भीती न बाळगता लग्नामध्ये गावकऱ्यांनाही सामील करत आईच्या मनातील अनामिक भीती दूर केली.
युवराजची आई आणि वडिलांचा विवाह 25 वर्षांपूर्वी झाला. युवराजचे वडील नारायण सेंट्रिंग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, युवराजचे शिक्षण सुरु असतानाच वडील नारायण यांचा अपघातात अकाली मृत्यू झाल्याने शेले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तेव्हापासून युवराची आई एकांतवासात गेली होती. आईची अशी अवस्था पाहून युवराज हताश झाला होता. त्यामुळे त्याने पहिल्यांदा आईला दुसऱ्या विवाहाची बोलून दाखवल्यानंतर तिने कडाडून विरोध केला. मात्र, युवराजने हार न मानता आईची समजूत काढण्यास सुरुवात केली. अखेर त्याला यश आले आणि आई दुसऱ्या विवाहासाठी तयार झाली.
इतर महत्वाच्या बातम्या