एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन, वाचन चळवळीला गती देणार; पालकमंत्री दीपक केसरकरांची ग्वाही

वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Kolhapur News : वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री केसरकर बोलत होते. कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

पालकमंत्री केसरकर म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठी भाषेचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांना पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच कोटी रुपयांची पुस्तके शाळांच्या ग्रंथालयांना देण्यात येतील. 

सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गाव भिलार प्रमाणे राज्यात पुस्तकांची गावे तयार करणे तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाप्रमाणे अन्य उपक्रम राबवून ग्रंथ वाचन चळवळीला बळ देण्याचे काम मराठी भाषा विभागामार्फत होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील शुभेच्छा संदेशात म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमधील वाचन संस्कृतीत वाढ होण्यासाठी तसेच ग्रंथालय चळवळ व वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ उपलब्ध व्हावेत तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने  ग्रंथोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानवाढ, गाव तिथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत ज्या गावामध्ये सार्वजनिक ग्रंथालय नाहीत त्या गावांमध्ये ग्रंथालयांना नवीन मान्यता देण्याबाबत आणि दर्जावाढीबाबत शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत.

ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील म्हणाले, समाजाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम ग्रंथ करतात. व्यक्तीला शिक्षित आणि सुसंस्कृत घडवण्याचे काम साहित्य करते. याचसाठी राज्यातील साहित्यिकांनी वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम करावे. समाजात वाढत चाललेली विकृती, मोबाईलचा होणारा गैरवापर हे चित्र बदलण्याचे काम ग्रंथच करु शकतात. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ज्ञानाचा सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे पुस्तके, ग्रंथ आहेत. ग्रंथांचा वापर हा केवळ कपाटात किंवा देव्हाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी न करता त्याचे नियमित वाचन करुन अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget