Kolhapur Crime : यादवनगरमध्ये 15 दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करत दगडाने ठेचून खून
अवघ्या 15 दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे.
Kolhapur Crime : अवघ्या 15 दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये घडली. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. मृत चिन्यावर मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे 10 ते 12 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीचीदेखील कारवाई झाली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार चिन्याचा चार मारेकर्यांनी थरारक पाठलाग करून त्याला दगडाने ठेचून खून केला. यादवनगर येथील महावितरण कार्यालयासमोरील चौकात घडली. हल्ल्यानंतर चौघे संशयित फरार झाले आहेत.
शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मृत चिन्या हळदकर आणि संशयितांमध्ये दौलतनगर परिसरात वादावादी झाली. याच वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळत असतानाच हल्लेखोरांनी महावितरण कार्यालयाजवळ गाठले. बेदम मारहाण झाल्याने तो खाली कोसल्यानंतर हल्लेखोरांनी हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला.
घटनेची वर्दी मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मारेकर्यांच्या शोधासाठी परिसरात मध्यरात्रीपर्यंत नाकेबंदी करण्यात आली होती. चिन्या हळदकरसह त्याच्या भावाने परिसरात मोठी दहशत होती. विविध गंभीर गुन्ह्यांत चिन्याला यापूर्वी अटकेची कारवाई करण्यात आली होती. 15 दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या