Kolhapur News : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने युवकाची किटनाशक पिऊन आत्महत्या, मृत्यूच्या दारात वडिलांना सांगितले कारण
Kolhapur News : उपचार सुरू असताना विवेकने नागपूरच्या प्रेम करत असलेल्या एका मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर हा प्रकार केल्याचे वडिलांना सांगितले. उपचारादरम्यान विवेक याचा मृत्यू झाला.
Kolhapur Crime : प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने 30 वर्षीय युवकाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. विवेक विष्णुदास शर्मा (वय 30, रा.जानकीनगर, तीन बत्ती चौक, इचलकरंजी) असे त्या युवकाचे नाव आहे. नागपूरच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने विवेकने कोल्हापुरात येऊन आत्महत्या केली. कोल्हापुरातील सासने मैदानजीक असणाऱ्या बागेत त्याने आत्महत्या केली.
विवेक कोल्हापुरात कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर बाहेर पडला होता. गुरुवारी (16 मार्च) रात्री त्याने सासने मैदानाजवळच्या एका बागेत विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले. प्रकृती गंभीर झाल्याने खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान विवेक याचा मृत्यू झाला. उपचार सुरु असताना विवेकने नागपूरच्या प्रेम करत असलेल्या एका मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर हा प्रकार केल्याचे वडिलांना सांगितले.
तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या
दुसरीकडे, कोल्हापुरात भयावह आत्महत्यांच्या मालिका सुरुच आहेत. गुरुवारीच इचलकरंजीत शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केली. त्या तरुणाला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मृताची ओळख पटलेली नाही, पण 21 ते 22 वर्षे वयाचा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
इचलकरंजीमधील मलाबादे चौकात महापालिकेच्या मालकीची शॉपिंग सेंटरची इमारतीमध्ये गुरुवारी सायंकाळी अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एका तरुणाने उडी मारली. बाजूला असणाऱ्या छत्रपती शिवाजी उद्यानात तो पडला. हा आवाज ऐकून महापालिका कर्मचाऱ्यांनी याठिकाणी धाव घेत 108 रुग्णवाहिकेला पाचारण करुन गंभीर जखमी झालेल्या तरुणाला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
दुसरीकडे, कोल्हापुरात विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्येची घटना ताजी असतानाच तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली. युवतीने आत्महत्येपूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या असून त्यामध्ये तिने त्रास देणाऱ्या तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी, असे नमूद केले आहे. कोल्हापूर शहरातील बोंद्रेनगरात हा प्रकार घडला. नकुशा साऊ बोडेकर (वय 19, रा. ओम गणेश मंडळ, बोंद्रेनगर) असे तिचे नाव आहे. नकुशाने लिहिलेल्या दोन सुसाईड नोटमध्ये तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या