एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापुरात ‘थर्टी फस्ट’ला 'देशी'पेक्षा 'विदेशी' नजराणा घेण्यास सर्वाधिक पसंती!

Kolhapur News : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जय्यत तयारी केली जात आहे. रस्सा मंडळे, हाॅटेल सुद्धा चांगलीच संज्ज झाली आहेत.

Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जय्यत तयारी केली जात आहे. रस्सा मंडळे, हाॅटेल सुद्धा चांगलीच संज्ज झाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी देशी मद्य सेवनाचे 26 हजार 700, तर विदेशी मद्य सेवनाचे 60 हजार 600 परवाने देण्यात आलेत. 5 हजार 115  आजीवन मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वितरित करण्यात आले आहेत. थर्टी फर्स्टसाठी दारू पिणाऱ्यांकडे परवाना आवश्‍यक आहे. अन्यथा कारवाई करण्यासाठी शहर आणि परिसरात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये नाकेबंदी सुरू केली आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बिअर बार आणि परमीट रुम, देशी-विदेशी विक्री केंद्रावर दारू पिण्याचा एकदिवसीय परवाना उपलब्ध केला आहे. त्यांच्याकडून दारु पिणाऱ्यांकडे या परवान्यांची विचारणा होणार आहे. हे परवाने दुकानांत उपलब्ध आहेत. तसेच नेहमी अकरा-साडेअकरापर्यत खुले असणारे परमीटरूम बिअर बार 31 डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत खुले राहणार आहेत. तर देशी दारु विक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत असतील अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातून देण्यात आली.

जल्लोषासाठी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. गोव्यातून  थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी दारू तस्करी होण्याची शक्यता असल्यामुळे सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. कागल चेकपोस्ट, चंदगडमध्ये तिलारी, आजरा रोडवरील गौसे तिट्टा, गगनबावडा येथे करूळ घाटात, राधानगरी येथे अभयारण्याजवळ फेजिवडे परिसरात आणि शाहूवाडीत आंबा घाटात पथके तैनात असतील. प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. 

दरम्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य या वन परिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, वनक्षेत्रात आणि धरणाच्या ठिकाणी होणाऱ्या सेलिब्रेशनमुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वन अभयारण्ये आणि परिसरातील पर्यटन स्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवली जातील. 2 जानेवारीपासून ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली होतील. (kolhapur police)

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget