एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात तरुणीने मृत्यूला कवटाळले, दोन वर्षांपूर्वी मोठ्या बहिणीने सुद्धा केला होता आयुष्याचा शेवट 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे. 

करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने मंगळवारी पहाटे राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक असलेल्या लेकीने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने आई वडिल मुळापासून हादरून गेले आहेत. दोन मुलींनी आत्महत्या केल्याने सातपुते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वडिल सर्जेराव सातपुते सानिका न उठल्याने पाहण्यासाठी गेले असता सानिका आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून  आली. सर्जेराव सातपूते यांनी बीडशेडमध्ये जागा घेऊन घर बांधले होते. एक महिन्यांपूर्वीच त्यांनी वास्तूशांती केली होती.  मात्र, मुलीने त्याच घरात आत्महत्या केली. 

दोन्ही मुलींकडून आत्महत्येने शेवट

कष्टातून संसार फुलवलेल्या सर्जेराव सातपुते यांच्या आयुष्याची शोकांतिका झाली आहे. मोठी मुलगी असलेल्या ऋतुजाने सुद्धा आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. तिने विष पिऊन आत्महत्या केली होती. याचा विसर पडत नाही तोवर दुसऱ्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव आहे. धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने  दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दुसऱ्या मजल्यावर श्रद्धाला जेवण्यासाठी हाक मारण्यासाठी घरातील सदस्य वर गेला असता श्रद्धाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. 

सव्वा वर्षाच्या बाळाला स्तनपान करून होमगार्डच्या पत्नीने जीवनयात्रा संपवली

वरील घटना ताजी असतानाच पोटच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या लेकराला स्तनपान केल्यानंतर त्याला झोपवून विवाहितेनं आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील यादवनगर परिसरात शनिवारी घटना घडली. निकिता ओंकार येडगे (वय 25 ) असे या विवाहितेचे नाव असून तिचा पती होमगार्ड आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या मुलाला स्तनपान करून झोपवल्यानंतर निकीताने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ॉ

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget