Hasan Mushrif on Raj Thackeray : दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल, जनता पैशाला भीक घालत नाही; हसन मुश्रीफांचे राज ठाकरेंना कडक प्रत्युत्तर
Hasan Mushrif on Raj Thackeray : दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे, जनता पैशाला भीक घालत नाही, अशा शब्दात आमदार हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
Hasan Mushrif on Raj Thackeray : दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल स्थानी आहे, जनता पैशाला भीक घालत नाही, अशा शब्दात माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरच्या 'पाकीट पॅटर्न'मुळे वाट लागली या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे कोल्हापुरातील जनतेचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. राज ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर कोल्हापूरच्या 'पाकीट पॅटर्न'मुळे वाट लागल्याचे वक्तव्य केले होते. कोल्हापुरातील जनता पैसे घेऊन मतदान करतात असे राज ठाकरे यांना म्हणायचे आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
सीमाप्रश्न आताच कसा बाहेर येतो?
लक्ष वळवण्यासाठी हे होतेय का? मूळ बातमीकडून लक्ष घालवण्यासाठी हे होत आहे का? याची छाननी करण्याची आवश्यकता आहे. सीमाप्रश्न आताच चर्चेत येण्याचे कारण काय? तो तर न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
राज्यपालांसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर दौरे कसे काय सुरू झाले? त्यापेक्षा ते, आधीच का जनतेला भेटले नाहीत, असा सवाल करत या संदर्भातील माझी टीका ही त्यांच्या आरोग्यावर नव्हती, तर त्यावेळच्या परिस्थितीवर होती, असे ते म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल काय बोलावे? राजकारणात अशी काही माणसे आहेत, ज्यांना मोठी पदे मिळतात, मात्र पोहोच येत नाही. कोश्यारी यांना कोणी स्क्रिप्ट लिहून देते का, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाबद्दल वक्तव्य केले. त्या काळात लहान वयात व्हायची लग्ने. त्यांचे अजूनही झाले नाही. राज्यातील एक नेता महिला नेत्याला शिवीगाळ करतो, हे दुर्दैवी आहे. ते माध्यमांनी दाखवणे बंद करावे.
इतर महत्वाच्या बातम्या