एक्स्प्लोर

Rajesh Kshirsagar : पोटनिवडणुकीत त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, हिंदुत्वावर बोलणाऱ्या बंडखोर राजेश क्षीरसागरांची अखेर खदखद बाहेर पडलीच!

कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. इतकंच नाही, तर नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही त्यांनी म्हटले होते.

Rajesh Kshirsagar : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे बंडखोर शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर खासदारांनी केलेल्या बंडाळीनंतर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने सुद्धा शिंदे कळपात सामील झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांची बंडखोरी आणि रस्त्यावरील निष्ठावंत शिवसैनिक एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. इतकंच नाही, तर नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांची मुळ खदखद आता बाहेर पडली आहे. पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, असे म्हणत संजय पवार यांना उमेदवारीला आपला कडाडून विरोध होता हे आता त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे सांगून टाकले आहे. ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका त्यांनी केली. 

आज उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. त्यांना आता शिवसेनाप्रमुख व्हायचं असल्याची टीका केली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार नसल्याचे ते म्हणाले. 

पक्ष कसा चालवावा हे शरद पवार यांच्याकडून शिकावं

राजेश क्षीरसागर यांनी पक्ष कसा चालवावा हे शरद पवारांकडून शिकावे, असे सांगत उद्धव ठाकरे यांना उपदेशाचे धडे दिले. देव मंदिरात राहिला पाहिजे हे म्हणत होतो, पण देवाला बाहेर काढलं आणि टीका होऊ लागली हे आता त्यांनीच मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. महाआघाडी लोकांना पटली नव्हती याचा अनुभव आम्हाला येत होता,  नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध असे अनेक मुद्दे असतानाही बोलता येत नव्हते. कसलं हिंदुत्व आमचं राहील होत? ही गद्दारी नाही,  क्रांती आहे. शिवसेना दुसऱ्याच्या हातात जात होती म्हणून ही क्रांती केल्याचे ते म्हणाले. 

दर 15 वर्षांनी ही परिस्थिती का येते याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे. जे काय घडलंय त्याला मान्यता द्यावी. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून वाईट नाहीत पण काही नेते कानात सांगतात असा दावाही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget