एक्स्प्लोर

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान; सोयाबीन, भात, भुईमूग पीके धोक्यात; गळीप हंगाम लांबण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेली पिकांची नासाडी होण्याची भीती आहे

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेल्लया पिकांची नासाडी होण्याची भीती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तब्बल चार तास पाऊस कोसळला. करवीर, हातकणंगले शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने काल अक्षरश: थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, रुई व तेरवाड हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. यंदाच्या मोसमात कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच जून महिन्यातील अपवाद वगळल्यास पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तथापि, परतीच्या पावसाने मात्र आता रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. 

परतीच्या पावसाने हाहाकार

जिल्ह्यात भात आणि सोयाबीन पिकांच्या मळणीने गेल्या 15 दिवसांपासून वेग घेतला असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार सुरु केला आहे. त्यामुळे भात, सोयाबीन तसेच भूईमुग पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. पावसाने शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन आणि भूईमुगाला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्याने भात पीक शेतात झोपल्याने झडण्यासह  पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.    

शेतकरी पिके काढण्याच्या तयारीत असतानाच पावसाने खोडा घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सहाय्यक कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस पडल्याने धान्य आणि बियाणे यांची वाढ थांबते. गुणवत्ता ढासळते आणि शेतकर्‍यांना उत्पादनात नुकसान होते. लवकरात लवकर हाताला आलेल्या पिकांची कापणी करावी आणि कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत, असा सल्ला आम्ही देत आहोत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना भुईमूग आणि भात काढणीचा सल्ला दिला आहे. 

ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता 

दुसरीकडे पावसाने हाहाकार केल्याने ऊस गळीत हंगाम सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. राज्यात ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार असला, तरी परतीचा पाऊस थैमान घालत असल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने ऊस वाहतूक करताना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. 

गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस 

  • हातकणंगले-46.7  
  • शिरोळ-12.2 
  • पन्हाळा-47.3 
  • शाहूवाडी-38.8  
  • राधानगरी-20.5 
  • गगनबावडा-66.7 
  • करवीर-50 
  • कागल-20.2  
  • गडहिंग्लज-8.4 
  • भुदरगड-15.8 
  • आजरा-6.1 
  • चंदगड-2.6 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Embed widget