एक्स्प्लोर

Heavy rain across Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर; पेठवडगावमध्ये वीज कोसळल्याने फटाका गोडावून उद्ध्वस्त

Heavy rain across Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. कोरडा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले परिसरात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

Heavy rain across Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. कोरडा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले परिसरात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक (57.4 मिमी), तर शाहूवाडी विभागात सर्वात कमी (2.9 मिमी) पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात 10.9 मिमी, तर साताऱ्यात 7.4 मिमी आणि सोलापूरमध्ये 15.8 मिमी पाऊस झाला.

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी 13 ऑक्‍टोबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाध्यांवर  30 ते 40 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. मंगळवारी संध्याकाळी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या गावांना IMD कडून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आणि सखल भागात पाणी साचले. राजारामपुरी, महाद्वार रोड, केएमसी चौक, एसटी स्टँड, व्हीनस कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

हातकणंगले आणि इचलकरंजी शहरांना जोडणाऱ्या तारदाळ, रुकडी आणि माणगाववाडी गावातील रेल्वेच्या भूयारी मार्गांवर पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मार्ग बंद केल्यामुळे, तारदाळ भूयारी मार्गातून लोक धोकादायकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसले. 

पेठवडगावमध्ये वीज कोसळल्याने फटाका गोडावून उद्ध्वस्त

दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील फटाका विक्रेते शिकलगार ब्रदर्स यांच्या रामनगरातील गोडावूनच्या खोलीवर मंगळवारी पहाटे वीज पडल्याने भीषण स्फोट झाला. स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटात गोडावूनची खोली जमीनदोस्त झाली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील काही घरांच्या, बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून हजारो रुपयांचे नुकसान झाले. 

मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वार्‍यासह ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाने मुसळधार पाऊस पेठवडगाव शहराला झोडपत होता. सकाळी साडेसातच्या सुमारास विजेचा लोळ रामनगरातील शिकलगार यांच्या बंद गोडावूनवर पडला. यावेळी स्फोट झाल्याने खोलीचे पत्रे, विटा, दगड हवेत उडून शेजारच्या शेतात पडले. विजेचा लोळ पडलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजीSantosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Uddhav Thackeray: अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकांवर उद्धव ठाकरे डाफरले, म्हणाले, 'ज्यांना जायचंय त्यांनी जा'
Fact Check : मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
मुनव्वर फारुकीला मारहाण झाल्याचा दावा करत व्हिडीओ व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
SN Subrahmanyan:  पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण
एस.एन. सुब्रह्मण्यन यांचं 90 तास कामाचं लॉजिक नेमकं काय? टीका होताच एल अँड टीचं स्पष्टीकरण
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
Manoj Jarange Patil : धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
Embed widget