एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टी, 56 बंधारे पाण्याखाली; तीन लघू प्रकल्प 100 टक्के भरले, कळंबा तलावही जूनमध्येच ओव्हरफ्लो

Kolhapur Rain Update: कळंबा तलाव सुद्धा आज पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. कळंबा तलाव आजपर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हरफ्लो होत होता. मात्र, यंदा जून महिना संपण्यापूर्वीच ओव्हर फ्लो झाला आहे.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा जून महिन्यामध्येच मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा महापुराची धास्ती वाटू लागली आहे. पंचगंगा नदी मोममात पहिल्यांदाच मंगळवारी पात्राबाहेर पडली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावर ती 33 फूट पाच इंचावर पोहोचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 56 बंधारे पानाखाली गेले आहेत.त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोदे, जांबरे आणि घटप्रभा हे लघू प्रकल्प 100 टक्के भरले आहे. दुसरीकडे राधानगरी धरणांमध्ये 65 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने 3100 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे

कळंबा तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो 

दरम्यान, कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या कळंबा तलाव सुद्धा आज पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. कळंबा तलाव आजपर्यंत ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हरफ्लो होत होता. मात्र, यंदा जून महिना संपण्यापूर्वीच कळंबा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणाची पातळी सरासरी 60 टक्क्यांच्या आसपास गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा धरणांमध्ये पाणीसाठा जून महिन्यामध्येच मुबलक प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणे लवकरात लवकर भरण्याची चिन्हे आहेत.  

अलमट्टी धरणातून 70 हजार क्युसेकने विसर्ग 

दरम्यान, अलमट्टी धरणातून 70 हजार 435 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणात पाण्याची आवक सुद्धा तितक्याच प्रमाणात आहे. धरणाची पाणी पातळी 516.33 मीटर झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखील बंधारे

  • पंचगंगा नदी: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • कुंभी नदी: सांगशी, शेणवडे, कळे, मांडुकली
  • कासारी नदी: ठाणे, आळवे, यवलुज, बा. भोगांव
  • भोगावती नदी: हळदी, राशिवडे, शिरगांव, सरकारी कोगे, तारळे
  • दुधगंगा नदी: दत्तवाड, सोळंबी, सुळकुट, बाचणी
  • वारणा नदी: मांगले- सावर्डे, कोडोली
  • हिरण्यकेशी नदी: साळगाव, ऐनापूर, निलजी, हाजगोळी, हरळी, भडगाव, झरळी
  • तुळशी नदी: बीड, आरे, बाचणी
  • घटप्रभा नदी: कानडेसावर्डे, हिंडगांव, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, पेळणी, भिजुरर्भोगली
  • वेदगंगा नदी: म्हसवे, गारगोटी, करवडे, शेणगाव
  • सर्फनाला नदी: दाभीळ
  • ताम्रपणी नदी :- कुरतणवाडी, कोकरे, चंदगड, हल्लारवाडी, माणगाव
  • वित्री नदी: करपेवाडी 
  • धामणी नदी: सुळे, अंबर्डे

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thane Ashok Saraf: अशोक सराफांच्या उपस्थितीत अंबरनाथमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण
Black Diwali : बेरोजगार तरुणांची काळी दिवाळी, ठाण्यात आंदोलन
Mira Road Accident: मीरा रोडमध्ये भीषण अपघात, चिमुकलीचा जागीच मृत्यू
Panvel Water Crisis: पाणीटंचाईमुळे पनवेलमध्ये नवीन बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी
Worli Fire: वरळीतील महाकाली नगरमध्ये भीषण आग, झोपडपट्टीला आग, सिलेंडरचा स्फोट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईतील महसूल विभागाच्या शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Embed widget