एक्स्प्लोर

Hasan Mushrif on Manoj Jarange Patil : एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ; मंत्री हसन मुश्रीफांचा दावा

Hasan Mushrif : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे चालत जाऊ नये, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी चालत जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (20 जानेवारी) मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता शासकीय पातळीवर सुद्धा धावाधाव सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif on Manoj Jarange Patil) कोल्हापूरमध्ये बोलताना मोठा दावा केला आहे. 

मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ

एक आठवड्याच्या आत मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापूरमध्ये बोलतानाते म्हणाले की सरकारच्या निर्णयाने मराठा समाजाच्या समाधान केले जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे चालत जाऊ नये, त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांनी चालत जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले. 

काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून आपल्यावर ट्रॅप केला जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी कोणी ट्रॅप केला हे सांगावे, असे सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात बोलताना जयंत पाटील यांच्याकडून सुनावणीबाबत कोणती खबरदारी घेतली, मला माहित नाही असे सांगितले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून 24 जानेवारीला त्यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबत विचारण्यात आले असता मुश्रीफ यांनी काही तथ्य नसल्यास रोहित पवार चौकशीला सामोरे जातील, असे सांगितले. 

मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार

दुसरीकडे, मुश्रीफ करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये स्वच्छता करणार आहेत. याबाबत बोलताना म्हणाले की, राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आव्हान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ स्वच्छता करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मनाप आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राम मंदिर व्हावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिर तयार झाले मी राम, राम माझा ही भावना सगळ्यांची आहे. कागलमध्ये एक लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget