एक्स्प्लोर

Kolhapur News : 'गोकुळ' जातिवंत म्हैस पैदास केंद्राची उभारणी करणार; आमदार सतेज पाटील यांची माहिती

मागणी वाढल्याने जनावरांच्या किमती वाढत आहेत. यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या जातीवंत दुधाळ म्हशी गोकुळ कार्यक्षेत्रात तयार व्हाव्यात यासाठी केंद्राची उभारणी करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

Kolhapur News : 'गोकुळ'कडून  (Gokul) जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणीचा उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली. या माध्यमातून चांगली जनावरे कोल्हापूर जिल्ह्यामध्येच मिळतील. भविष्यात सर्वांसाठी जातिवंत म्हशींची खरेदी-विक्रीचे बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. सतेज पाटील यांनी सांगितले की, सध्या जिल्ह्यात दूध उत्पादकांना उच्च वंशावळीच्या जातिवंत म्हशी (मुऱ्हा, मेहसाणा जाफराबादी) खरेदी करण्यासाठी परराज्यांमध्ये जावे लागते. मागणी वाढल्याने जनावरांच्या किमतीही वाढत आहेत. यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या जातिवंत दुधाळ म्हशी गोकुळ कार्यक्षेत्रात तयार व्हाव्यात यासाठी केंद्राची उभारणी करणार आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधत उत्पादकांकडून 51 म्हशींची खरेदी 

गोकुळने (Gokul) 20 लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या मार्गदर्शनात शिरोली दुमाला येथील दूध उत्पादकांनी आमदार सतेज पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरियाणा जातीच्या 51 म्हशी खरेदी केल्या आहेत. आमदार पाटील यांच्या हस्ते त्या जनावरांचे पूजन झाले आणित्या दूध उत्पादकांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले की, "माझ्या 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण सर्वांना या पद्धतीचा हा एक शेतकरीभिमुख उपक्रम राबवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. विश्‍वास पाटील म्‍हणाले की, गोकुळकडून दूध उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रामाणावर राबवला जात आहे. दूध उत्पादकांनी जातिवंत जनावरे खरेदी करुन दूध वाढ कृती कार्यक्रमात भाग घेतला आहे. दूध उत्पादकांचा हा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी दूध उत्पादकांनी प्रयत्नशील राहावे."

यावेळी संचालक बाबासाहेब चौगुले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यू.व्ही.मोगले, सहायक व्यवस्थापक डॉ. प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, शाहू दूध संस्थेचे चेअरमन सचिन विश्वास पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे, राहुल पाटील, नंदकुमार पाटील,माधव पाटील, एस.के.पाटील, शशिकांत खोत उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget