एक्स्प्लोर

Rajaram Sakhar Karkhana : अवैध उमेदवारावरून दोन्ही गटाची सुनावणी पूर्ण; सोमवारच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष

राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या 29 अवैध उमेदवारांवरून प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. विरोधी गटाकडून  पहिल्यांदा बाजू  मांडण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाकडून गुरुवारी बाजू मांडण्यात आली. यामुळे आता अवैध ठरलेल्या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (10 एप्रिल) ठरणार आहे. दरम्यान, सत्ताधारी महाडिक गटाकडून 29 उमदेवारांना पोटनियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांची छाननी झाल्याची भूमिका गटाचे वकील लुईस शहा यांनी मांडली. प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्यासमोर दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. त्यामुळे निकालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राजाराम कारखाना निवडणूक जाहीर होण्यापासून चर्चेत आहे. जिल्ह्यातील दोन मातब्बर गटांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी गटातील 29 उमेदवार अवैध ठरल्यानंतर या संघर्षाला आणखी धार आली आहे. विरोधी आघाडीचे नेतृत्व करत असलेल्या आमदार सतेज पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या निकालानंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरुप स्पष्ट होणार आहे. 

विरोधकांचा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही

दरम्यान, राजाराम कारखाना म्हणजे श्रमाचे मंदिर आहे. 28 वर्ष या मंदिरात आम्ही सर्व संचालक प्रामाणिकपणे सेवा देत आहोत. पण, काही स्वार्थी लोक सभासदांनी उभारलेले आणि जपलेले हे मंदिर बळकावू पाहत आहेत. त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, मंदीरासारखा जपलेला हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात देऊ नका, असे आवाहन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले. करवीर तालुक्यातील गावांमधील सभासदांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. विरोधक केवळ सुडाच्या राजकारणातून बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणुकीत परिवर्तन आवश्यक 

दुसरीकडे, शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळावा आणि उसतोड वेळेत मिळावी ही भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत लढा उभारला आहे. सभासदाच्या हितासाठी परिवर्तन आघाडीला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. राधानगरी तालुक्यात विविध गावांमध्ये आयोजित शेतकरी सभासदांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सभासद हाच कोणत्याही संस्थेचा खरा मालक असतो. सभासदांच्या फायद्यासाठी संस्था कार्यरत असणे आवश्यक असते. कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासदांचा सन्मान राखण्यासाठी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Dr. Babasaheb Ambedkar : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिकत असतानाच ते सर्व हिंदुस्थानाचे 'पुढारी' होतील हे सांगणारे करवीरचे छत्रपती शाहू महाराज होते!

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget