Gokul : गोकुळचे मंगळवारपासून चाचणी लेखापरीक्षण; संचालिका शौमिका महाडिक यांनी केली होती चौकशीची मागणी
शौमिका महाडिक यांनी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर चौकशी लागली आहे. राज्य लेखा परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार गोकुळच्या दूध संघाच्या चाचणी लेखा परीक्षणाचे येत्या मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
Gokul : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर चौकशी लागली आहे. राज्य लेखा परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार गोकुळच्या दूध संघाच्या चाचणी लेखा परीक्षणाचे येत्या मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अहमदनगरचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब मसुगडे यांनी गोकुळच्या प्रशासनाकडे (Gokul Milk) केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार गोकुळच्या चाचणी लेखा परीक्षणाचे काम आपण सक्षमपणे करू, असे त्यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाच्या 2021-22 या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे केली होती. त्यानुसार मंडळांने गोकुळचे चाचणी लेखा परीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. आदेश मिळाल्यानंतर आपण लेखा परीक्षणासाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असे गोकुळला मेल पाठवून कळवले असल्याचेही मसुगडे यांनी सांगितले. दरम्यान, गोकुळला चाचणी लेखा परीक्षणाचा आदेश प्राप्त झाला आहे.
दरम्यान, गोकुळच्या (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विरोधी गटातील महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांच्यातील कलगीतुरा सुरुच आहे. सतेज पाटील यांनी केवळ दोन वर्ष कशाला, 25 वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी टीका केल्यानंतर आता शौमिका महाडिक यांनीही जोरदार पलटवार केला आहे.
25 वर्षातील कारभार काढण्यापासून रोखलेलं नाही
शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी पत्रक प्रसिद्धीस देऊन सतेज पाटलांवर (satej Patil) टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तुमची सत्ता आहे. 25 वर्षातील कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं नाही. वैयक्तिक खुन्नस ठेवून तुम्ही गोकुळ संघाची बदनामी केली." पत्रकात पुढे म्हटले आहे की, "माजी पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ ‘गोकुळ’च्याच एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला. गोकुळमध्ये सतेज पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे 25 वर्षातील कारभार काढण्यापासून त्यांना कोणी रोखलेलं नाही. तरीही वैयक्तिक खुन्नस ठेऊन त्यांनी संघाची जेवढी बदनामी करायची तेवढी केलीच. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत."