एक्स्प्लोर

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश नसल्याने कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समित्यांचे अंतिम मतदारसंघ जाहीर 

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग आरक्षणासह अंतिम मतदारसंघ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहेत.

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आघाडी सरकारने कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारने सत्तेत येताच केराची टोपली दाखवली आहे. 2017 मध्ये जी मतदारसंघांची रचना होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढविलेली सदस्य संख्या कमी होणार आहे.  

मात्र, या संदर्भात कोणताही आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मिळाला नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे प्रभाग आरक्षणासह अंतिम मतदारसंघ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहेत. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आल्यानंतर आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. यानंतर प्रशासनाकडून 2 ऑगस्टपर्यंत यावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. यानंतर 42 हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या हरकती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फेटाळून लावल्या.  महाविकास आघाडी सरकारकडून लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषद 76 आणि 12 पंचायत समित्यांमधील 152 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. 

कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 9 ने वाढवून 76 झाली होती

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पूर्वी कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 अशी निश्चित केली होती. त्यानुसार छोट्या जिल्ह्यात सदस्यांची संख्या 50 होती, तर मोठा जिल्हा कितीही असला तरी 75 पेक्षा सदस्यांपेक्षा अधिक करता येत नव्हती. त्यामुळे लोकसंख्या आणि मतदानामध्ये वाढ झाल्याने महाविकास आघाडी सरकारने झेडपी सदस्य संख्येत कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 अशी सदस्य संख्या केली होती. या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 9 ने वाढवून 76 झाली होती.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मतदारसंघांची पुनर्रचना केल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 76 मतदारसंघ, तर पंचायत समित्यांचे 152 मतदारसंघ निश्चित करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षण प्रक्रियाही राबवण्यात आली होती. त्यामुळे लढतींचे  चित्र स्पष्ट झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. 

नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचे नव्या शासनाने ठरविले आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची संख्या पूर्वीइतकीच राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget