मुख्यमंत्री म्हणून मला आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती, डबल इंजिन सरकारने विकासातील स्पीड ब्रेकर हटवले : एकनाथ शिंदे
डबल इंजिन सरकार काम करत आहे. मागील अडीच वर्षाच्या सरकारने ब्रेक लावला होता, स्पीडब्रेकर होते. मी आणि देवेंद्रजी येताच ते सर्व स्पीडब्रेकर हटवले, सगळे ब्रेक काढून टाकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Eknath Shinde in Kolhapur: दोन दिवसांपूर्वी एक सर्व्हे आला, यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली आहे. हे श्रेय एकट्या एकनाथ शिंदे यांचं नाही. यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे आणि केंद्र सरकार आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे श्रेय आहे आणि राज्यातील जनतेचं श्रेय आहे. म्हणूनच आम्ही अनेक योजना राज्यामध्ये राबवत आहोत. आमचा प्रत्येक प्रस्ताव केंद्राकडे जातो, एकही पैसा कमी न करता मंजूर होतो. या राज्यात म्हणून डबल इंजिन सरकार काम करत आहे. मागील अडीच वर्षाच्या सरकारने ब्रेक लावला होता. स्पीडब्रेकर होते. मी आणि देवेंद्रजी येताच ते सर्व स्पीडब्रेकर हटवले, सगळे ब्रेक काढून टाकले आणि सगळ्या कामांना चालना दिली असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ही गर्दी पाहून विरोधकांचे टांगा पलटी घोडं फरार होणार नाही ना? विषय हार्ड केला आहे तुम्ही. या मातीने पराक्रम शिकवला आहे. निधड्या छातीचा कोल्हापूरकर संकटावर मात करतो. शिंदे यांनी बोलताना पंचगंगा प्रदुषण मुक्तीचा निर्धार बोलून दाखवला. ते पुढे म्हणाले की, आम्ही जलसिंचनाची सुरुवात केली. शिवरायांचा आदर्श ठेवला आहे. योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी होत आहे. सगळं एका छताखाली देत आहोत. हे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे सरकार आहे. आतापर्यंत घेतलेल्या 35 ते 40 कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतले आहेत. दीड लाख लाभार्थ्यांची नोंद कोल्हापुरात झाली आहे. यामधील 60 हजार लाभासाठी आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, काही याठिकाणाहून ड्रोन घेऊन गेले, आप आधुनिक शेतीकडे आपण वळत आहोत. सिंचन प्रकल्प मंजूर नव्हता, आमच्या सरकारने 29 प्रकल्प मंजूर केले आहेत. महिलांसाठी योजना केल्या आहेत. पीएम किसान योजनेत आणखी 6 हजार वाढवले, 12 हजार मिळणार आहेत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. महाराष्ट्र पुन्हा विकासाकडे जात आहे, कोल्हापूरची जनता आग्रही आहे. कोल्हापुरातील टोल बंद करणारा एकनाथ शिंदे होता, यासाठी धाडस लागते असेही शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या घोषणा