Hasan Mushrif ED Raids : हसन मुश्रीफ दुसऱ्यांदा ईडीच्या रडारवर; कागलच्या चौकाचौकात समर्थकांची तोबा गर्दी
Hasan Mushrif ED Raids : माजी कामगार मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे.
Hasan Mushrif ED Raids : माजी कामगार मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. कागलसह पुण्यामध्येही ईडीकडून ही छापेमारी सुरू करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त कागलमध्ये तैनात करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू झाल्याचे समजताच कागलमध्ये काही चौकाचौकांमध्ये समर्थकांची मोठी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान मुश्रीफ दुसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता. त्यावेळी महिला मोठ्या प्रमाणातून महिला घरासमोर जमा झाल्या होत्या. तसेच विराट मोर्चा काढला होता. या प्रकरणांनतर आता दुसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने मुश्रीफ यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मनी लॉंडरिंग तसेच बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार मुश्रीफांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचे कोलकातामधील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांमध्ये दिसून येते. ही सर्व कागदपत्रे ईडी आणि प्राप्तिकर विभागाला दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.
मुश्रीफ यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली होती. आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत आरोप फेटाळून लावले होते. व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच 1000 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते.
दरम्यान आज सकाळी माहिती समोर आलेल्या माहितीनुसार माजी मंत्री आमदार मुश्री यांच्या बंगल्यावर तसे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी छापेमारी सुरू केली आहे. मुश्रीफ आणि गाडेकर यांच्या निवासस्थानाला दिल्ली पोलिसांनी वेडा दिला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. छापेमारीची माहिती मिळताच कागलच्या गैबी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सुरू केली आहे. सोमय्या यांना 1 जानेवारी ट्विट करताना हसन मुश्रीफ यांचाही उल्लेख केला होता. यापूर्वी उल्लेख केलेल्या ट्वीटमध्ये अनिल परब यांची संपत्ती जप्त झाली आहे. त्याचबरोबर आता मुश्रीफ यांच्याही घरावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा आणखी एक नेता आता ईडीच्या रडारवर आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या