Shivaji University Exam : पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा स्थगित, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार
Shivaji University Exam : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाकडून 10 तसेच 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
![Shivaji University Exam : पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा स्थगित, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार Due to flood situation Shivaji University has postponed the examination, revised schedule will be announced separately Shivaji University Exam : पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा स्थगित, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/10/786416df2267e3a39324adceff9444aa166012785373588_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivaji University Exam : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाकडून 10 तसेच 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आता या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालकांनी दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने (Kolhapur Rain Update) पंचगंगा नदीने मोसमात प्रथमच इशारा पातळी गाठली आहे. त्याचबरोबर राधानगरी धरणही पुर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती नदीमध्ये मोठा विसर्ग सुरु आहे. काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 96.9 मिमी पाऊस झाला.
पंचगंगेची पाणी पातळी 40 फुट 8 इंचांवर गेली असून तिने इशारा पातळी गाठली आहे. धोका पातळी 43 फुट आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्लीनजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
राधानगरी 236.13 दलघमी, तुळशी 88.19 दलघमी, वारणा 879.31 दलघमी, दूधगंगा 599.89 दलघमी, कासारी 65.46 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.25 दलघमी, पाटगाव 93.49 दलघमी, चिकोत्रा 39.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
गेल्या 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस
हातकणंगले- 12, शिरोळ -3.9, पन्हाळा- 48.9, शाहूवाडी- 56.2, राधानगरी- 54.2, गगनबावडा- 96.9, करवीर- 26.4, कागल- 13.6, गडहिंग्लज- 13.9, भुदरगड- 35.6, आजरा- 44.5, चंदगड- 51.4
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)