एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Devendra Fadnavis on Sanjay Raut: संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली, तर मी बेळगावात येणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

पक्षाची भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे. मराठी भाषकांच्या मागे मी आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच भाजपने मराठा बोर्ड येथे तयार केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis on Sanjay Raut: काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करत बेळगावमध्ये आल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. संजय राऊतांचा बेळगाव दौरा पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज (1 मे) बेळगावमध्ये पोहोचले. यावेळी पोहोचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुसरीकडे, विरोधात प्रचार करत असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले. फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी बेळगावात आलो आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख देखील मुख्यमंत्री असताना कर्नाटकात ते सगळीकडे फिरत होते मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी येथे आलो आहे. मराठी भाषकांच्या मागे मी आणि भारतीय जनता पार्टी देखील आहे. म्हणूनच भाजपने मराठा बोर्ड येथे तयार केला. 

तर मी इकडे येणार नाही

देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis on Sanjay Raut) संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी इकडे येणार नाही. राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी इकडे येत आहेत. त्यांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे ते त्यांना सांगायला हवे होते की येथे उमेदवार उभे करू नये. काँग्रेसच्या सांगण्यावरून भाजपची मते कमी करण्यासाठी संजय राऊत दलाली करत आले. शिल्लक सेनेकडे मुद्दे नसले की असे मुद्दे मांडतात. मात्र, शरद पवार यांनी त्यांचे सर्व मुद्दे नेस्तनाबूत केले आहेत. 

फडणवीसांना काळे झेंडे दाखवले, धिक्काराच्या घोषणा 

दरम्यान, भाजप उमेदावराच्या प्रचारासाठी बेळगावात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने सगळ्या राजकीय पक्षांना केले होते, पण तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव उत्तरचे भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारासाठी आल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. फडणवीस यांच्या धिक्काराच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी लगेच धाव घेत समिती कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणाकडे जाण्यापासून रोखले. पोलिसांनी समिती कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget