एक्स्प्लोर

चंदगड आणि आजऱ्यात काजू फळ विकास योजनेसाठी 1,325 कोटी रुपयांची तरतूद; पालकमंत्री दीपक केसरकरांची माहिती 

राज्याचा अर्थसंकल्प (Budget) ‍कोल्हापूर जिल्ह्याला (Kolhapur News) प्रगतीच्या दिशेने नेणारा असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

Kolhapur News : राज्याचा अर्थसंकल्प (Budget) ‍कोल्हापूर जिल्ह्याला (Kolhapur News) प्रगतीच्या दिशेने नेणारा असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. कोकणासह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा येथे काजू फळ विकास योजना राबविणार असून त्यासाठी आगामी 5 वर्षांसाठी 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काजू बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजू बोंडाला सात पट अधिक भाव मिळत असल्यामुळे काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी या केंद्राचा निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. 

कोल्हापुरी चप्पल जगभरात प्रसिध्द आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टरची घोषणा केल्यामुळे या उद्योगाला निश्चित चालना मिळेल. त्याचबरोबर महिलांची व महिला बचत गटांची उन्नती होण्यास मदत होईल. याबरोबरच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येणार असून याचा उपयोग जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

दीपक केसरकर पुढे म्हणाले की, शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासन  ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ राबवणार आहे. तसेच जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यात येत असून शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासन भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीकविमा सुविधा मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महा कृषी विकास अभियान राबविण्यात  येणार आहे. यात पीक, फळपिकांच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया तसेच  तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.

मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर उपलब्ध होणार आहेत. या योजनेवर एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित उपयोग होईल. या योजनांसह राज्याच्या अर्थसंकल्पात शाश्वत शेती, शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे व गडकिल्ल्यांचा विकास, पायाभूत सोयी-सुविधा, रोजगार निर्मिती, कुशल- रोजगारक्षम युवा व कलाकारांचा विकास, पर्यावरणपूरक विकास होण्यासाठीही तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget