(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur : तब्बल अडीच दशकांपासून तिरंगा फडकवणाऱ्या दरेकर कुटुंबीयांच्या घरी जात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून वंदन
Kolhapur News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावण्याचा सन्मान सर्वसामान्य भारतीयांना मिळाला. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातील अजित दरेकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत.
Kolhapur News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावण्याचा सन्मान सर्वसामान्य भारतीयांना मिळाला. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातील अजित दरेकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. मागील अडीच दशकांपासून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनाला तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधला.
दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी दरेकर आपल्या घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात आली. यानिमित्ताने दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घरी जावून त्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाची दखल घेऊन अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनाकडून दरेकर यांच्या या उपक्रमावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्रफितीला मिळालेला उत्फूर्त प्रतिसाद ही देशभक्तीची भावना जागृत करणारी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगत दरेकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव केला.
यावेळी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकताना पाहण्यात खरा आनंद मिळत असल्याचे अजित दरेकर यांनी यावेली आपल्या भावना व्यक्त करताना सांगतिले. यावेळी संगीतकार ऐश्वर्य मालगावे, अजित दरेकर व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
- Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफांनी दोन म्हशी घेतल्या आणि स्वत:च कागलच्या गैबी चौकात त्यांचे स्वागत केले!
- Kolhapur News : विधवा व गरीब कुटुंबांचा घरफाळा कोल्हापूर जिल्ह्यातील उपसरपंचाने स्वत:च्या खिशातून भरला!
- Kolhapur Rain : पंचगंगा नदीचा पूर झपाट्याने ओसरला, राधानगरी धरणाचा एक दरवाजा सुरु
- Kolhapur News : स्वातंत्र्यदिनी पुरोगामी कोल्हापुरात डीजेच्या तालावर धार्मिक कार्यक्रमात तरुणींचा भर रस्त्यात धूर काढत नाच!