Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधी यांनी 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी करवीर तालुक्यातील उचगावमध्ये एका दलित टेम्पोचालकाच्या घरी भेट देत सर्वांनाच चकित केले होते.
![Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं? dalit family says no one knows what we eat Rahul Gandhi said so I have come to see What happened after visiting a Dalit family home in Kolhapur Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/2ca7de43829d9de677ed1c242a62129c1728289268444736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rahul Gandhi In Kolhapur : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी करवीर तालुक्यातील उचगावमध्ये एका दलित टेम्पोचालकाच्या घरी भेट देत सर्वांनाच चकित केले. अर्थात समतेच्या नारा देशपातळीवर दिलेल्या राजर्षी शाहूंच्या भूमीतील त्यांच्या कृतीने निश्चितच त्यांनी संदेश दिला. तसेच आजही सर्वसामान्य, पददलितांना भेटण्यासाठी आपण कोणताही संकोच ठेवत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. दलित कुटुंबातील भेटीचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर केला आहे. कांद्याची भाजी आणि भाकरी आवडल्याचे ते आवर्जुन सांगताना दिसून येत आहेत.
'दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही'
राहुल गांधी यांनी अजय सनदे आणि अंजना सानदे यांच्या घरी अचानक भेट दिली होती. यावेळी राहुल यांनी थेट स्वयंपाकघरात घरातही हात आजमावला. राहुल गांधी म्हणाले, आजही दलित किचनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शाहू पाटोळे जी म्हटल्याप्रमाणे, 'दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही.' राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेवताना राहुल गांधी जास्त मिरची खात नसल्याचे सांगतात. यादरम्यान ते मी किती मिरची टाकली होती, असे म्हणताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुल यांनी म्हटले आहे की, आजही फार कमी लोकांना दलित किचनबद्दल माहिती आहे. शाहू पाटोळे जी म्हटल्याप्रमाणे दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही. ते काय खातात, ते कसे शिजवतात आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व याबद्दल उत्सुकतेने मी अजय सनदे आणि अंजना सनदे यांच्यासोबत एक दुपार घालवली.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
संविधानाचे आम्ही रक्षण करू
राहुल म्हणाले की, त्यांनी मला आदरपूर्वक घरी बोलावले आणि स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी आणि कांद्याच्या पातीची भाजी आणि तूर डाळ तयार केली. पाटोळेजी आणि सनदे कुटुंबीयांच्या जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना, आम्ही दलित आहाराबद्दल जागरूकता नसणे आणि या संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्व यावर चर्चा केली. संविधानाने बहुजनांना वाटा आणि अधिकार दिले आहेत आणि त्या संविधानाचे आम्ही रक्षण करू. पण समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक भारतीय आपल्या अंतःकरणात बंधुत्वाची भावना ठेवून प्रयत्न करेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)