Satej Patil : कोल्हापुरातील पहिल्या इनडोअर स्टेडियमला स्थगिती आणण्याचं पाप धनंजय महाडिकांनी केलं; सतेज पाटलांची टीका
Satej Patil : तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील इनडोअर स्टेडियम बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु असतानाच आता मंजूर निधी पळवापळवीचा उद्योग सुरु झाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी मंजूर केलेल्या इनडोअर स्टेडियमचा निधी इतर कामांसाठी वळवण्यात आल्याने सतेज पाटील यांनी तोफ डागली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur News) पहिल्या इनडोअर स्टेडियमला स्थगिती आणण्याचं पाप धनंजय महाडिकांनी केल्याचा घणाघात सतेज पाटील यांनी केला.
सतेज पाटील बोलताना म्हणाले की, अनेक विकासाकामांना स्थगिती देण्यात आली. हायकोर्टाटून स्थगिती आणली गेली आणि काही कामे केली. पहिले इंनडोअर स्टेडियम कोल्हापुरात होणार होतं. मात्र, त्याला महाडिक यांनी स्थगिती दिल्याचं माहिती समजते. त्यांनी ते काम बाहेर नेलं. हे पाप असून खेळाडूंवर अन्याय आहे. आदल्या दिवशी या स्टेडिमयला स्थगिती देऊन काम रद्द केले. कोल्हापूर मनपाला गेल्या पावणे तीन महिन्यांपासून आयुक्त नेमणूक करण्यात आलेली नाही. यावरूनही त्यांनी तोफ डागली. शासन किती गतिमान आहे याचीच ही प्रचिती असल्याची टीका त्यांनी केली.
धनंजय महाडिकांकडून इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव रद्द
दरम्यान, तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील इनडोअर स्टेडियम बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र त्या कामाची वर्कऑर्डर देण्यापूर्वीच खासदार धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) यांनी राज्य सरकारकडून इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव रद्द करून आणाला. तसेच तो मंजूर करून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात इतर विकासकामांसाठी वापरण्याचा आदेश आणला.
नगर विकास विभागाने शहरातील मूलभूत सोयी सुविधांसाठी 30 मार्च 2022 रोजी निधी मंजूर केला होता. त्यातून स्टेडियम उभारण्यात येणार होते. त्याचा आदेशही काढण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने 10 कोटींच्या इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव तयार केला होता. बालिंगामध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दीत इनडोअर स्टेडियम प्रस्तावित होते. त्यामध्ये सरकारचा 75 टक्के तर महापालिकेचा हिस्सा 25 टक्के होता.
शरद पवारांच्या दौऱ्यावर काय म्हणाले?
दरम्यान, शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, 25 ऑगस्टला कोल्हापुरात आल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहे. कोल्हापूरकरांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या