एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कोल्हापुरात; दौऱ्याची गुप्तता बाळगल्याने राजकीय भूवया उंचावल्या

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मठावर साजरा करण्यात आलेल्या पंचमहाभूत लोकोत्सावात सहभागी होण्यासाठी फेब्रुवारीमध्ये आले होते.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (28 ऑक्टोबर) अचानक कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यामुळे मंत्र्यांपासून ते आमदार, खासदांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच मराठा क्रांती मोर्चाने कडाडून विरोध केल्याने दौरा रद्द करावा लागला आहे. त्यामुळे परिस्थिती किती टोकाला जाऊन पोहोचली आहे, याची कल्पना येते. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे कणेरी मठावर जाऊन भेट देणार आहेत. या दौऱ्याची कोल्हापूर पोलिसांकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसांकडून या संदर्भात कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मठावर जाण्याचे काय कारण असावे, याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मठावर साजरा करण्यात आलेल्या पंचमहाभूत लोकोत्सावात सहभागी होण्यासाठी फेब्रुवारीमध्ये आले होते. त्यानंतर हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी भेट होत आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये ते कशासाठी भेट घेत आहेत किंवा खासगी दौरा आहे का? या संदर्भाने सुद्धा माहिती मिळू शकलेली नाही.

कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला!

दरम्यान, कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काल (27 ऑक्टोबर) दोनदा अडवून जाब विचारण्यात आला. आता मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकामध्ये उद्या रविवारी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत. 

 कोल्हापूरमध्येही राजकीय पुढाऱ्यांना आता प्रवेशबंदी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. त्या गावांमध्ये जोवर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात न येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावोगावी असे अनेक फलक उभा राहून राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुढाऱ्यांना बंदी घातलेल्या गावांमध्ये राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे, चंदगड तालुक्यातील निठूर, शाहुवाडी तालुक्यातील रेठरे वारणा, राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे, कागल तालुक्यातील हळदवडे आणि एकोंडी, करवीर तालुक्यातील इस्पूर्ली, नंदगाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे, पाडळी खुर्द  या गावांचा समावेश आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget