Post Office Small Saving Scheme: पोराबाळांपासून ते घरातल्या म्हाताऱ्यांपर्यंत! पोस्टाच्या 'या' 7 योजनांमुळे शेअर मार्केटचा 'लोड' घ्यायची गरज नाही!
Post Office Small Saving Scheme: देशातील विविध विभागांच्या गरजांनुसार या योजना तयार करण्यात आल्या आहेत. योजना आकर्षक बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी त्यांचे व्याजदर बदलत असते.
Post Office Small Saving Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईचा काही भाग बचतीसाठी ठेवतो. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी आजही देशात मोठी लोकसंख्या आहे जी केवळ सरकार समर्थित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. पोस्ट ऑफिस देशातील करोडो लोकांसाठी वेळोवेळी अनेक बचत योजना घेऊन येत असते. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र इत्यादीसारख्या अनेक लहान बचत योजनांच्या नावांचा (Post Office Small Saving Scheme) समावेश आहे.
देशातील विविध विभागांच्या गरजांनुसार या योजना तयार करण्यात आल्या आहेत. योजना आकर्षक बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी त्यांचे व्याजदर बदलत असते. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देत आहोत.
1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस योजनेचे नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील नागरिकांना संयुक्त खात्यात 30 लाख रुपये जमा करून 8.2 टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. तर एका खात्यात 15ख रुपये जमा करण्याची परवानगी आहे.
2. सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारच्या मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. या योजनेत तुम्हाला दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवण्याची सुविधा मिळते. यानंतर मुलीचे वय 21वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती संपूर्ण रक्कम काढता येते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी सरकारने 8.00 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
3. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सिंगल किंवा संयुक्त खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत, जास्तीत जास्त 15 लाख रुपये संयुक्त खात्यात गुंतवले जाऊ शकतात आणि एका खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी सरकारने या योजनेचा व्याजदर 7.4 टक्के निश्चित केला आहे.
4. किसान विकास पत्र
किसान विकास पत्र योजना ही पोस्ट ऑफिसची आणखी एक छोटी बचत योजना आहे ज्या अंतर्गत तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते. या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही आणि सरकार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत या योजनेवर 7.5 टक्के व्याजदर देत आहे.
5. पोस्ट ऑफिस आरडी योजना
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही देखील एक उत्तम छोटी बचत योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्ही दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून मोठा निधी मिळवू शकता. या योजनेअंतर्गत, 5 वर्षांच्या आरडी योजनेवर 7.5 टक्के कमाल व्याज दर देत आहे.
6. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉजिट स्कीम
पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे किंवा 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. हे बँकांच्या एफडी योजनेसारखेच आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
7. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
ही पोस्ट ऑफिसच्या दीर्घकालीन बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दरवर्षी 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. योजनेअंतर्गत 7.1टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
इतर महत्वाच्या बातम्या