Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. शिवस्वराज्य यात्रेत गडहिंग्लज तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अमर चव्हाण यांनी तडाखेबंद भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणातून चांगलीच टोलेबाजी केली.
ईडी हा शब्द तुम्हाला आणि मला कधी बघायला मिळाला?
ते म्हणाले की, महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे, गद्दारांसोबत जाणार नाही. ईडी हा शब्द तुम्हाला आणि मला कधी बघायला मिळाला? या पाच दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये मिळाला. ऊसाला पाणी पाजले आहेत, ज्यांनी शेतात नाचणा लावला, रताळी लावली त्याच्याकडे येणार नाही. ज्यांनी लावलेली रताळी मोडून खाल्ली त्याकडे ईडी येऊ शकते. म्हणून गद्दार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आज राज्य कोणत्या दिशेने चालले आहे. ते म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्याने सांगितले, 1600 रुपयांचा तेलाचा डबा किती रुपयाला गेला? 1600 रुपयांचा तेलाचा डबा 2400 रुपयाला गेला. लाडक्या बहिणीला दिले किती आणि लाडक्या बहिणीकडनं काढून घेतलं किती याचा कॅल्क्युलेशन करणं माझ्या माता भगिनींना नक्की सांगावा लागेल. गॅसची टाकी फुकट दिली, पण गॅसच्या टाकीचा दहा वर्षातील दर बघितला काँग्रेसचे सत्तेत होती त्या दिवशी चारशे रुपये लागत मिळत होतं. तेच गॅस अकराशे रुपयांवर गेलं आहे. हे भाजप सरकारने वाढवलं.
आमच्या एसटीच्या किमान टायरी घाला
आज आणखी सांगितलं जातंय एसटी महामंडळात जशी विमानामध्ये तशी एक परी ठेवलेली असती तशी एसटी परी ठेवणार म्हणतात. आमच्या गडहिंग्लज डेपोची अवस्था जर बघून घ्या. चंदगडपर्यंत जावा किमान दोन एसटी बंद पडलेल्या दिसतात. या सरकारला आमचा आवाहन आहे ती सुंदरी नको आमच्या एसटीच्या किमान टायरी घाला. आमची पोरगी सकाळी सहाला उठून एसटीला उभारते आणि त्या पोरगीला एसटी मिळत नाही तिचं कॉलेज चुकतंय. तुमच्याकडून ती परी बघायची इच्छा नाही. आमची घरातली परी शाळेला चालली या परीला वेळेत पोहोचवा आणि त्या परीला वेळेत घरला आणा आम्हाला सुंदर पऱ्या बघायची गरज नाही. माझ्या जन्माला आलेली पोटाची तीच पोरगी माझी परी आहे. त्या परीला सुरक्षित ठेवा ती परी माझी सुरक्षित नाही.
इतर महत्वाच्या बातम्या